रोजगार

अक्षय बागडेचा अनिल मेश्राम यांनी केला सत्कार

सडक अर्जुनी. :- सडक अर्जुनी येथील रहिवासी अक्षय भोजराम बागडे याने न्यायालयीन विभागाद्वारे आयोजित परीक्षा २०२३ ला दिली होती.त्यात घवघवीत यश संपादन करुन जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (ज्युनिअर क्लर्क) पदाकरीता निवड झाली आहे.ही बातमी समजताच सौंदड निवासी समाजशील शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल मेश्राम यांनी शनिवारी (ता.१४) अक्षय बागडे यांचे घरी जाऊन वडिलांचे उपस्थितीत अक्षयला शाल, भारताचे संविधान, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या प्रसंगी नीलकमल स्मृती फाउंडेशनचे आयोजक तथा सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम उपस्थित होते. अभिनंदन करून अक्षय सोबत संवाद साधून माहिती जाणून घेतली.अक्षय याने एस चंद्रा शाळेतून २०१७ ला दहावी उत्तीर्ण केली तर १२ वी नेवजाबाई हितकारीणी कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथून २०१९ ला उत्तीर्ण झाला. नंतर साकोली येथील बाजीराव करंजेकर कालेज ऑफ फार्मसी येथून बी फार्म ची पदवी प्राप्त केली.अक्षय हा अभ्यासात हुशार असून शिक्षणाबरोबरच टाईपींग ची कामे करायचा.स्पर्धा परीक्षेची तयारी करुन जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदावर निवड झाली. याचे याचे श्रेय आई, वडील व बहिणीला दिले आहे..त्याच्या निवडीबद्दल मेश्राम व गावकऱ्यांनी अक्षयचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.