गोंदिया जिल्हा परिषदेचा 2024-25 चा 34 कोटी खर्चाचा सुधारित अर्थसंकल्प सादर
२०२५-२६ वर्षाचा संभाव्य खर्चाचा १९ कोटी ६९ लाख ७५ हजार रुपयाचा अर्थसंकल्प सादर
गोंदिया : – जिल्हा परिषदेचा सन २०२4-२०२5 चा सुधारीत 34 कोटी 78 लाख 45 हजार रुपये व २०२5-२6 चा 19 कोटी 69 लाख 75 हजार रुपयांच्या संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.अर्थ सभापती डाॅ.लक्ष्मण भगत यांनी आज (दि.११) सभागृहात सादर केला.विद्यार्थ्यांना ओळखपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,बौध्दिक स्पर्धा,शाळेकरीता पाण्याची व शौचालयाची व्यवस्था आणि स्वाधाय पुस्तिका उपलब्ध करुन देण्याकरीता नवीन लेखाशिर्ष तयार करण्यात आले असून संभाव्य अंदाजपत्रकात २.२० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे.
अर्थसंकल्पात महिला बालकल्याण, समाजकल्याण, पाणी पुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी १ वाजता जि.प.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरू सुरवात झाली. जि.प. बांधकाम तथा अर्थ सभापती डाॅ.लक्ष्मण भगत व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापूरे, महिला बालकल्याण सभापती सौ. पौर्णिमा ढेंंगे, समाजकल्याण सभापती सौ.रजनी कुंभरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरंगनथन,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुतीरकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषदेचे वर्षातील सुधारित उत्पन्न २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात 16 कोटी 03 लाख 77 हजार रुपयाचे मूळ अंदाजपत्रक होते.ते सुधारित करुन ३४ कोटी ७८ लाख ४५ हजार रुपयाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
विशेष म्हणजे घड्याळी तासिकेवरील शिक्षक नियुक्तीकरीता सुधारित अंदाजपत्रकात ८४ लाख रुपये तर 202५-2६च्या संभाव्य अर्थसंकल्पात ५० लाख रुपयाती तरतूद करण्यात आली आहे.अटल क्रिडा स्पर्धेकरीता सुधारीत अंदाजपत्रकात ४० लाख रुपये तर संभाव्य अंदाजपत्रकात २५ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी याकरीता दुकानगाळे बांधकामाकरीता 202५-2६ च्या संभाव्य अर्थसंकल्पात 30 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जि.प.सदस्यांच्या स्थानिक विकास निधीकरीता २०२५-2६ या वर्षाकरीता 3 कोटी 18 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
सार्वजनिक मालमत्तेच्या परिरक्षणाकरीता ६ कोटी ७६लाख २३ हजार,शिक्षणावर २ कोटी २० लाख २६ हजार, आरोग्य विभागाकरीता ८६ लाख ७५ हजार रुपये,समाजकल्याण विभाग,मागासवर्गीयांच्या कल्याणसााठी योजनेकरीता ७० लाख ६० हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के निधी अंतर्गत १९ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.महिला बाल कल्याण विभागाकरीता १ कोटी ३२ लाख ५७ हजाराची तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाकरीता १ कोटी ४१ लाख ७१ हजार,पशुसंवर्धन विभागाकरीता ७३ लाख ६६ हजार, सामान्य प्रशासन विभागाकरीता २ कोटी ४७ लाख ३० हजार, वित्त विभागाकरीता ६० लाख ५१ हजार रुपये, पंचायत विभागाकरीता ७८ लाख ६२ हजार, लघु पाटबंधारे विभागाकरीता ९२ लाख ५४ हजार रुपयाचा निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती सभापती भगत व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी सभागृहाला दिली.

Pingback: buy cheap enclomiphene generic germany
Pingback: medicament kamagra pharmacie en ligne en suisse medicament
Pingback: androxal with no r x and free shipping
Pingback: buy flexeril cyclobenzaprine buy from canada
Pingback: buy cheap dutasteride price at walmart
Pingback: ordering gabapentin generic uk next day delivery
Pingback: buy fildena cheap prescription
Pingback: buy itraconazole generic health
Pingback: cheapest buy staxyn without prescriptions canada
Pingback: purchase avodart cheap mastercard
Pingback: buy cheap rifaximin generic uk buy
Pingback: purchase xifaxan price singapore
Pingback: kamagra poštou