सामाजिक

राणी अवंतीबाई लोधीच्या प्रेरणेने संजना शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहे : इंजि राजीव ठकरेले


तिरोडा :- तालुक्यातील सालेबर्डी गावात अंजीलाल बोहणे यांनी आपल्या क्षेत्रात सन 2000 ते 2008 मध्ये जवळपास १० वाचनालय सुरू केले होते. त्यांचा उद्देश होता की आपल्या क्षेत्रातील जास्तच जास्त मुला-मुली स्पर्धा परीक्षेत भाग घ्यावा आणि त्यात उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंब सह क्षेत्राचाही नाव लौकिक करावा पण शासनाच्या अटीसरती व नियम यात त्यांची गाडी अटकली व हळूहळू एक एक वाचनालय बंद होत गेल्या. त्यातच सालेबर्डी गावात सुरू केलेली सन 2008 मध्ये डॉक्टर सेवकलाल बोहणे नावाने सुरू केलेली वाचनालय हे ही बंद पडली.

वडिलांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या गावात एकही सरकारी कर्मचारी नाही आता आपल्याला गावात शिक्षणाविषयी जागरूकता आणून स्पर्धा परीक्षा ला पुढे जाऊन त्यात उत्तीर्ण होऊन गावात जास्त सरकारी कर्मचारी तसेच उच्च पदाधिकारी व्हायला पाहिजे या जिद्दीने अंजीलाल बोहणे यांची मुलगी संजना बोहने हिच्या प्रयत्नाने काल दिनांक 24 एप्रिल 2025 ला डॉ सेवकलाल बोहने वाचनालय तसेच राणी अवंतीबाई लोधी अभ्यासिका केंद्राचे शुभारंभ ओबीसी समाजाचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदिया चे संचालक इंजि राजीव ठकरेले यांच्या अध्यक्षतेखाली माननीय राधेलालजी पटले (उपाध्यक्ष डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह सेंट्रल बँक गोंदिया) व माननीय अनंतलाल दमाहे (राष्ट्रीय अध्यक्ष आलोक संघ )यांच्या संयुक्त हस्ते करण्यात आला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वनिताताई भांडारकर (पंचायत समिती सदस्य) वनिताताई ठाकरे (अध्यक्षा मानवाधिकार संघ गोंदिया) ज्ञानेश्वर दमाहे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) महेंद्र लिल्हारे, (जिल्हा प्रतिनिधी न्यूज प्रभात मीडिया) खुशाल नागपुरे, नानेश्वर बिरणवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे कार्यक्रम चा आयोजन अंजीलाल बोहणे,हितेश कुमार निनावे, विजय कुमार बोहने, सोमप्रकाश बाभरे, शुभम जवरे इत्यादींनी केला. कार्यक्रम चे संचालन नंदकिशोर बोबडे यांनी केला.

तर प्रस्तावना संजना बोहणे हिने ठेवली तर आभार प्रदर्शन राकेश अटरे यांनी केला. शिक्षणाच्या दिशेने ही एक मोठी कामगिरी संजना आणि यांच्या संपूर्ण टीम तसेच गावकऱ्यांनी केला यासाठी संपूर्ण क्षेत्रात या कार्याची कौतुक होत आहे.