स्वास्थ

तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समिती सभा संपन्न

आमगाव :- तालुक्यातील तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.15 मे रोजी जन आरोग्य समितीची सभा जिल्हा परिषद सदस्या उषाताई मेंढे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.
या सभेमध्ये विविध आरोग्य विषयक कामकाज व समस्यांवर चर्चा करण्यात आली, तसेच आरोग्य संस्थेत पुढिल आर्थिक व भौतिक बाबीवर चर्चा करुन नियोजन करण्यात आल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रेमकुमार बघेले यांनी दिली आहे. जन आरोग्य समितीचे अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांनी यांनी कार्यक्षेत्रातील लोकांना गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचे निर्देषित करुन आरोग्य संस्थेच्या समस्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
जन आरोग्य समिती सभे दरम्यान आमगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रोशन राऊत,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांचेसह सदस्य दुर्गेश्वरजी पटले,भारतीबाई येळे,राहुल सेवईवार,एस.के. गोखले,नमिताताई बघेले,सुदमाबाई बोपचे, हंसराजजी जोशी,शतृघनजी रहांगडाले,संतोषजी बघेले,आरोग्य विस्तार अधिकारी शैलेंद्र झाडे, तालुका आरोग्य सहाय्यक प्रशांत बंसोड,जिल्हा शित साखळी लस तंत्रज्ञ गौरव मसराम,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विजय बिसेन व आरोग्य संस्थेतीतील इतर सर्व आरोग्य कर्मचारी,आशा सेविका,गट प्रवर्तक,आरोग्य सेवक,समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका,परिचर उपस्थित होते.