23 सप्टेंबर रोजी केटीएस सामान्य रुग्णालयात आयुर्वेद दिवस साजरा
गोंदिया :- भारत सरकारने २३ सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिनासाठी निश्चित केला आहे. हा दिवस आयुर्वेद दिन जगभरातील लोकांना आणि पृथ्वीला निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदाचा वापर कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करतो. या निमित्ताने संपूर्ण देशभरात आयुर्वेदाशी संबंधित विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.दि.२३ सप्टेंबर 2025 रोजीची थीम “लोक आणि पृथ्वीसाठी आयुर्वेद” अशी असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी यावेळी दिली.
आरोग्य विभाग,राष्ट्रीय आरोग्य अभियान,आयुष विभाग व केटीएस सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त सहकार्याने दि.२३ सप्टेंबर रोजी केटीएस शासकिय रुग्णालय येथे जिल्हास्तरीय आयुर्वेद दिन जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.तृप्ती कटरे यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मीना वट्टी,डॉ.सुवर्णा हुबेकर उपस्थित होते.
२०२५ च्या आयुर्वेद दिनाची थीम, “लोकांसाठी आणि ग्रहांसाठी आयुर्वेद” (आयुर्वेद लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी),पर्यावरणीय संतुलन आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देताना आयुर्वेदाद्वारे वैयक्तिक कल्याणाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत असल्याचे डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी माहीती दिली. तर डॉ.अभिजीत गोल्हार यांनी ही थीम आयुर्वेदाच्या समग्र स्वरूपाला प्रोत्साहन देते, वैयक्तिक आरोग्याला पर्यावरणाच्या आरोग्याशी जोडते आणि शाश्वत पद्धतींना पुढे नेते, ज्यामुळे समकालीन जागतिक आव्हानांवर उपाय म्हणून आयुर्वेदाला स्थान मिळत असल्याचे स्पष्ट केले.आयुर्वेदाची थिम हि पर्यावरणीय संतुलनाचे महत्त्व, मानवी आरोग्य आणि पर्यावरणीय आरोग्य यांच्यातील संबंध आणि शाश्वत पद्धतींना समर्थन देण्यासाठी आयुर्वेदाचा वापर अधोरेखित करत असल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.तृप्ती कटरे यांनी या प्रसंगी दिली.
आजच्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधुन वृक्ष लागवड,समुपदेशन,योगा सत्र,पोषणहार व आयुर्वेद प्रचार व प्रसार पुस्तिकेचे वाटप असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष अधिकारी डॉ.मिना वट्टी,संचालक डॉ.ममता पिडेकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.मुकेश येरपुडे यांनी केले.कार्यक्रमांमध्ये डॉ.महेंद्र संग्रामे,डॉ.नीलिमा कुथे, डॉ.शाहीर खान,डॉ.नाहीद कौसर,डॉ.स्वर्णरेखा उपाध्याय,डॉ.गायत्री धाबेकर,डॉ.अर्चना जाधव, स्वप्ना खंडाईत,ममता कानतोडे,योग शिक्षक राजेश चुटे,संजय बिसेन,सुनंदा रामटेके,कमलेश चापले, अनिरुद्ध शर्मा,ललित शेंडे उपस्थित होते.
