सहसंचालक डॉ.सरिता हजारे यांची गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेटी
तिरोडा/गोंदिया :- तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय,तालुका नियंत्रण पथक व ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट तिरोडा तसेच गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी व आरोग्य उपकेंद्र गंगाझरी येथे भेट देवुन आरोग्य सेवा व स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची केली पडताळणी.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आरोग्य विभागाचे सहसंचालक(प्रा.आ.केंदे/उपकेंद्र) डॉ.सरिता हजारे यांची नागपुर विभागासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान नोडल अधिकारी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्यानुसार दि. 6 ऑक्टोंबर रोजी सहसंचालक डॉ.सरिता हजारे व डॉ.मुलानी त्यांची चमू यांनी गोंदियातील आरोग्य संस्थाना भेटी दिल्यात.सर्वात प्रथम भेटीत तिरोडा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय,तालुका नियंत्रण पथक व ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट तिरोडा येथे भेट देण्यात आली.उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे ऑपरेशन शस्त्रक्रियागृह,रुग्ण भर्ती वॉर्ड, एनआरसी,प्रयोगशाळा येथे भेट देवुन विविध सेवा व स्वस्थ नारी-सशक्त परिवार अभियान कार्याची तपासणी करून मार्गदर्शन केले.ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट तिरोडा येथील प्रयोगशाळेची पाहणी करुन तेथील विविध तपासणी चाचण्याबाबत रजिष्टर व रिपोर्टची पडताळणी केली.
दुसर्या दुपार सत्र भेटीत गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी व आरोग्य उपकेंद्र गंगाझरी येथे भेट देवुन स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आढावा सोबतच आरोग्य संस्थेमार्फत राबविण्यात येणार्या आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.त्या सोबतच संस्थेची आतील बाहेरील परीसर स्वच्छता,प्रसुतीकक्ष,वॉर्ड,औषधीसाठा,लसीकरण कक्ष, प्रयोगशाळा,शस्त्रक्रिया कक्ष ई.ची पाहणी केली.पाहणी दरम्यान सहसंचालक यांनी लोकांना गुणवत्तापुर्वक आरोग्य सेवा देणे,आरोग्य संस्थेत प्रसुतीवर भर,मुख्यालयी वास्तव,आरोग्य योजना गावपातळी पर्यंत पोहचविणे,आरोग्य कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढविणे,साथरोग रोखण्यासाठी गृहभेटी वाढविणे,एनसीडी कार्यक्रम व आरोग्य मंत्री यांचा महत्वकांक्षी कार्यक्रम 2 कोटी महिलांची तपासणी अनुषंगाने महीला,गरोदर माता,किशोरवयीन यांची हिमोग्लोबीन, मधुमेह,रक्तदाब व कर्करोग जनजागृतीवर भर देण्याच्या सुचना देण्यात आल्या.
तिरोडा येथील भेटीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय डॉ.राहुल शेंडे, तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी,वैद्यकीय अधिकारी,डॉ.संजय भगत, डॉ.येरणे,डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे यांचेसह तालुका नियंत्रक पथक व उपजिल्हा रुग्णायलातील सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.गोंदिया येथील भेटीत जिल्हास्तरीय अधिकारी यांचे सह गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,एकोडी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बिसेन व डॉ. पल्लवी भगत, गंगाझरी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.मंगेश कामडी यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी व आरोग्य उपकेंद्र गंगाझरी येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
