स्वित्झरलँड येथील “स्टॉप टिबी”चे डॉ.रॉबर्ट स्टीफन यांचे गावपातळीवर भेटीतुन क्षयरोग कामकाजाची पाहणी
तालुक्यातील ग्रामपंचायत धानोरी, आयुष्मान आरोग्य मंदीर मालीजुंगा व ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे भेटी देवुन क्षयरोग कामकाजाची पाहणी केली
सड़क अर्जुनी :- जिनेव्हा स्वित्झरलँड येथील “स्टॉप टिबी”चे डॉ.रॉबर्ट स्टीफन तसेच आशाकल्प प्रकल्प डायरेक्टर दीपक जोशी यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत धानोरी, प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदीर मालीजुंगा व ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे (दि. 14 ऑक्टोबर) रोजी भेटी देवुन जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग कार्यक्रम कामकाजाची पाहणी केली.ग्रामपंचायत धानोरी येथे निक्षय शिबीरादरम्यान मोफत एक्स-रे शिबीर आयोजित केले होते त्याची पाहणी केली.सरपंच चेतनबाई पटले यांचेशी संवाद साधुन कार्यक्षेत्रात असलेल्या क्षयरोगी रुग्णांना दिल्या जात असलेले उपचार बाबत माहीती जाणुन घेतली.त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर राऊत,आरोग्य सहाय्यक ठाकरे, क्षयरोग पर्यवेक्षक देवेंद्र भाजीपाले उपस्थित होते.आयुष्मान आरोग्य मंदीर मालीजुंगा येथे सामुदायिक आरोग्य अधिकारी शुभांगी लटये तसेच उपस्थित आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवरांनी उपस्थित आरोग्य कर्मचारी तसेच अशा सेविका ग्रामस्थ यांच्याशी क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विषयी संवाद साधला.ग्रामीण गावपातळीवर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत धानोरी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान मिळाले. दुपारसत्रात ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे भेट देवून प्रयोग शाळेतील उपलब्ध सिबीनेट व ट्रुनेट अत्याधुनिक मशिनरीची पाहणी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत भारतास जिनेव्हा स्वित्झरलँड येथील “स्टॉप टिबी” व “आशाकल्प “प्रकल्प हे दोन्ही एनजीओ मार्फत अर्थसहाय्य दिल्या जात आहे.सदर अर्थसहाय्य कार्यक्रमाचा उद्देश 2030 पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करणे आहे.
क्षयरुग्णांचे वेळेवर निदान करणे आणि त्यांना दर्जेदार औषधे व उपचार देणे.क्षयरोग उपचारादरम्यान रुग्णाला पूर्णपणे सहाय्य करणे, जेणेकरून उपचार यशस्वी होईल. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे, सहव्याधी लोकसंख्येमध्ये विशेष लक्ष देवुन जास्त धोका असलेल्या लोकांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी केली जाणे.सरकारी आरोग्य केंद्रांवर क्षयरोगाचे निदान करण्यासाठी थुंकी तपासणी आणि जलद आण्विक चाचण्या त्यात सिबीनेट व ट्रुनेट अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने प्रयोगशाळेत विनामूल्य चाचण्या उपलब्ध करणे.जास्त धोका असलेल्या लोकसंख्येमध्ये(उदा.तुरुंगातील कैदी,बेघर लोक). क्षयरोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जाणे.अशा विविध बाबीतुन “स्टॉप टिबी” व “आशाकल्प” प्रकल्प हे दोन्ही एनजीओ मार्फत अर्थसहाय्य दिल्या जात आहे.
