अपघात

वैनगंगा नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू..! परिसरात शोककळा

गोंदिया :- जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात एक युवकाचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना दिनांक 4 मार्च रोजी दुपारी घडली. होळी सणाचा आनंद साजरा करत असताना बघोली गावावर शोककळा पसरली व पूर्ण वातावरण दुःखमय झाले. तालुक्यातील ग्राम बघोली येथील काही युवक हे बिरसोला नजीकच्या वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यातील मृतक नामे अमन गाडापेले वय 18 वर्षे राहणार बघोली या युवकाचा नदीपात्राच्या आत डोह असलेल्या भागात तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन रावणवाडी येथील चम्मू पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित घटनास्थळी पोचली व मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी करिता केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे नेण्यात आले. या घटनेचे गुन्हा दाखल करून पुढील तपास रावनवाडी पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यापुढे परिसरातील युवकांनी अत्यंत सावधगिरीचा पवित्रा घेऊन नदीपात्राकडे जावे अशा चर्चा परिसरात जोर धरत होत्या.