सामाजिक

भंडाऱ्यात लायन्स क्लबची भव्य शांतता रॅली

शांतता, बंधुभावाचा संदेश; सेवा सप्ताहालाही उत्साहात प्रारंभ

भंडारा :-  जागतिक शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सेवेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने भंडारा शहरात भव्य ‘पीस रॅली’चे आयोजन करण्यात आले. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 H1, रिजन 5, झोन 1 अंतर्गत लायन्स क्लब भंडारा, लायन्स क्लब भंडारा सेंट्रल, लायन्स क्लब भंडारा ब्राससिटी आणि लायन्स क्लब ग्रीनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विलास साखरे व एमसीसी प्रमुख भरत भलगट यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोन चेअरपर्सन प्रा. डॉ. बबन मेश्राम यांच्या नेतृत्वात रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, लोकेश मोहबंशी, दीक्षा निपाने आणि मोगेश खोब्रागडे यांच्यासह विविध क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रॅलीमध्ये स्थानिक शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच एस.जी.बी. डिफेन्स कॉलेज, शहापूर येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी व लायन्स सदस्यांनी हातात शांतता, बंधुभाव, सेवा आणि सामाजिक सलोख्याचे संदेश देणारे फलक व पोस्टर्स घेत शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढली. रॅलीमुळे शहरातील वातावरणात सामाजिक एकतेचा आणि शांततेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

गांधी चौकात रॅलीचा समारोप

रॅलीचा समारोप गांधी चौक येथील सार्वजनिक वाचनालय परिसरात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख धनंजय दलाल होते. यावेळी पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भरत भलगट, झोन चेअरपर्सन प्रा. डॉ. बबन मेश्राम, डॉ. सुलभा मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

याच कार्यक्रमादरम्यान लायन्स क्लबच्या ‘सेवा सप्ताहा’चा शुभारंभ करण्यात आला. सप्ताहाच्या माध्यमातून गरजू नागरिकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे, वृद्धाश्रमात अन्नदान, व्यसनमुक्तीविषयक जनजागृती, अन्नदान तसेच गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

विविध पुरस्कारांचे वितरण

शांतता रॅलीदरम्यान उत्कृष्ट सहभाग व सादरीकरणासाठी विविध पुरस्कारही देण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार पुरुष गटातून भंडारा ब्राससिटी लायन्स क्लबचे शेखर (बाळा) गभने, तर महिला गटातून डॉ. सुलभा मेश्राम यांनी मिळविला. उत्कृष्ट डिस्प्ले पुरस्कार लायन्स क्लब भंडारा सेंट्रलला, अधिकाधिक सदस्यांचा सहभाग पुरस्कार लायन्स क्लब ग्रीनसिटीला, तर उत्कृष्ट प्रशासन व संचलन पुरस्कार लायन्स क्लब भंडाराला दि. 8 आँक्टोबरला सेवा सप्ताह समारोप प्रसंगी मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रवीण पटेल, प्रशांत देशमुख, लोकेश मोहबंशी, दीक्षा निपाने, शेखर (बाळा) गभने, अँड. राकेश सक्सेना, ईश्वरलाल काबरा, नितीन कासेवाले, मिनाक्षी साकुरे, भक्ती मुटकुरे, मनोज साकुरे, दीपा मोगरे, सोनाली शहारे, रजनी देसाई, सारिका तलमले, कुमार नशिने, शीतल नशिने, डॉ. जगदीश निबार्ते, डॉ. कापगते, अँड. विनोद भोला, मोहन राठी, दिलीप हिरनवार, संजय बाळबुद्धे, नीरज बैस, विनोद भोंगाडे, निशांत लिल्हारे, पंकज कुमार राजाभोज, सीमा कनोजेया, ममता इलमकर, राजश्री चोपकर, मंगेश मुटकुरे, कल्पना जगने, शारदा रेवतकर, प्रा. नरेश आंबिलकर यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकेश मोहबंशी, संचालन प्रशांत देशमुख, तर आभार प्रदर्शन दीक्षा निपाने यांनी केले.

लायन्स क्लबचा सेवा आणि शांततेचा संदेश

यावेळी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “समाजात शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा टिकविण्यासोबतच गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हे लायन्स क्लबच्या सेवाकार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.” शांतता रॅली आणि सेवा सप्ताहाच्या उपक्रमाचे शहरवासीयांकडून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमास प्रवीण पटेल, प्रशांत देशमुख, लोकेश मोहबंशी, दीक्षा निपाने, शेखर (बाळा) गभने, अँड . राकेश सक्सेना, ईश्वरलाल काबरा, नितीन कासेवाले, मिनाक्षी साकुरे, भक्ती मुटकुरे, मनोज साकुरे, दीपा मोगरे, सोनाली शहारे, रजनी देसाई, सारिका तलमले, कुमार नशिने, शीतल नशिने, डॉ. जगदीश निबार्ते, डॉ. कापगते, अँड. विनोद भोला, मोहन राठी, दिलीप हिरनवार, संजय बाळबुद्धे, नीरज बैस, विनोद भोंगाडे, निशांत लिल्हारे, पंकज कुमार राजाभोज, सीमा कनोजेया, ममता इलमकर, राजश्री चोपकर, मंगेश मुटकुरे, कल्पना जगने, शारदा रेवतकर, प्रा. नरेश आंबिलकर यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकेश मोहबंशी, संचालन प्रशांत देशमुख, तर आभार प्रदर्शन दीक्षा निपाने यांनी केले.