महाप्रज्ञा बौद्ध विहार तिरोडा येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा..!
यावेळी महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती चे अध्यक्ष आयु. महेंद्र बडगे, उपाध्यक्ष लंकेश टेंभेकर, संघटक पवन वासनिक, कोषाध्यक्ष संजय जांभुळकर, सहकोषाध्यक्ष राहुल बडगे, माजी अध्यक्ष के. एफ. मेश्राम, सल्लागार सुरेश बंसोड, भारतीय बौद्ध महासभा तिरोडा शाखा अध्यक्ष तुलाराम वैद्य, आयु. नांदगाये सर , मणिद्र बंसोड, सुधीर मेश्राम, सुजाता डोंगरे, प्रवीण नंदागवळी , संजय राहुलकर, जगदीश बंसोड, जयकुमार बंसोड, अजय वैद्य, गुणवंत बंसोड, एड. अश्विन गेडाम, जितेंद्र भालधारे आणि सर्व उपासक, उपासिक व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम पंचशील धम्म ध्वजारोहन करून ध्वज वंदना करण्यात आली. त्यानंतर परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्नकृती प्रतिमेला माल्याअर्पण करून मेनबत्ती, अगरबत्ती व पुष्प अर्पण करण्यात आले.

यानंतर बौद्ध विहारातील महाकारुनिक तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आणि राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले, आणि महाप्रज्ञा बौद्ध विहार निर्मिती साठी भूमी दान देणार पूज्य भंते महाथेरो धम्मकीर्ती महाबोधी यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तदनंतर उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका यांना मिठाई चे वितरण करण्यात आले व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या…
