General

गोजु रियू नॅशनल रेफ्री ट्रेनिंग सेमिनार संपन्न

गोंदिया:- मार्शल आर्ट च्या जगात कराटे या क्रीडा प्रकारातील महत्त्वपूर्ण स्तंभ असलेल्या गोजु रियू स्टाईलचे नॅशनल रेफ्री ट्रेनिंग सेमिनार (दि.8) रोजी जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे उत्साहात पार पडले. या सेमिनारमध्ये काता, फायटिंग टेक्निक, रेफ्री स्किल आदी विषयांबाबत भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रँड मास्टर सिहान धीरज पवार यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनात पार पडले. सिहान धीरज पवार हे वर्ल्ड गोजु रियू कराटे डो फेडरेशन, आंतरराष्ट्रीय ओकिनावा गोजु रियू कराटे डो ऑर्गनायझेशन, एशियन गोजु रियु कराटे डो फेडरेशन चे सदस्य असून भारतातील विविध गोजु रियू कराटे डो फेडरेशनचे अध्यक्ष असून आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नावाजलेले आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.संपूर्ण देशभर या क्रीडा प्रकाराचे प्रचार प्रसार करत असताना महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्याची निवड झाल्याने खेळाडूंनी आनंदमय वातावरणात प्रशिक्षणाचा लाभ घेतला. पुढे होणाऱ्या राज्य,राष्ट्रीय व आशियाई स्पर्धांसाठी जिल्ह्यातील शेकडो खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या सेमिनारच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा अधिकारी मरसकोल्हे, ग्रँड मास्टर ईश्वर वरकडे, क्रीडा प्रशिक्षक अनिल शहारे, हे उपस्थित होते. सिहान जनार्दन कुसराम यांनी सूत्रसंचालन केले तर रूपाली उईके यांनी उपस्थित अतिथींचे आभार व्यक्त केले. या सेमिनारच्या यशस्वी ते करिता सेन्साई सुनील चिखलोंडे व इतर खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.