शहरातील स्वच्छतेसाठी दिले निवेदन!
गोंदिया:- शहरातील गोविंदपुर येथील वार्ड क्रमांक तीन परिसरातील सांडपाण्याच्या नाल्यांची सफाई न झाल्याने पावसाचे पाणी घरात प्रवेश करत असल्यामुळे तेथील नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. त्यामुळे परिवारात राहत असलेल्या छोट्या अबाल वृद्धांसह इतर सदस्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारी ही समस्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. सदर नागरिकांच्या या समस्यांचे तात्काळ निवारण करा व परिसराच्या स्वच्छतेची हमी द्या अन्यथा आंदोलन करू अशा मागण्यांचे निवेदन (दि.22) रोजी नगर परिषदेचे सीईओ करण चव्हाण यांना काँग्रेस पक्षाच्या महिला महासचिव रूपाली उके यांनी दिले आहे. यावेळी आलोक मोहंती, राजीव ठाकरेले हरीश तोडसकर, मीना मेश्राम,चंद्रशेखर मेश्राम ममता उके,पद्मा पाथोडे, शीला चुटे दीपक उके मोहित कुमार मेश्राम व परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.