राज्य राखीव पोलीस दलातर्फे सायकल रॅलीचे आयोजन
गोंदिया:- भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने ‘माझी माती माझा देश’ या मोहिमेच्या अनुषंगाने देशाची एकता व अखंडता जोपासण्याच्या दृष्टीने (दि.24ऑगस्ट)रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅली ची सुरुवात, सकाळी 7:00 वाजे पासून गट मुख्यालयातील समादेशक यांनी हिरवी झंडी दाखवून केली. ही रॅली पुढे कामठा, बिर्शी, खातिया येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. रॅलीचे रावणवाडी येथे आगमन होताच त्रिमूर्ती चौक येथे जी एस हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आलेल्या समादेशक प्रमोद लोखंडे, मंगेश शेलटकर व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले, जी ई एसचे प्राचार्य नागपुरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेला मल्ल्यारपण केले. यावेळी उपस्थित समादेशक प्रमोद लोखंडे यांनी शासनाच्या ध्येय धोरण विषयक माहिती उपस्थितांना दिली. देशातील 140 करोड जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कसे सुरक्षा दलात प्रवेश घ्यावे याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. यापुढे ही रॅली चारगावच्या दिशेने निघाली. यावेळी जीईएस समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनोद पटले, आनंद लांजेवार, सरपंच शीला वासनिक, पन्नालाल हरीणखेडे, डॉक्टर हरिणखेडे, पी एस नागपुरे, मौजे मॅडम खैरवार मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन एम एस ठाकरे सर, प्रास्ताविक मेंढे सर,तसेच आभार भेलावे सर यांनी केले.