नागपूर येथे राज्यस्तरीय मुस्लिम संमेलनाचे आयोजन
नागपूर प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील मागासवर्गीय मुस्लिमांना युती सरकारने 2014 मध्ये पाच टक्के मुस्लिम आरक्षण व त्यांच्यावर होणारे जातीय धार्मिक दंगली च्या विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत संरक्षण मिळावे तसेच त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे प्रतिनिधित्व मिळेल असे सांगितले होते मात्र अद्याप त्यावर कोणताही मार्ग निघाला नसल्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली भारतीय मुस्लिम परिषद व ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक संघटनांचे शिखर संघटन राष्ट्रीय संयुक्त मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ( दि.15 ऑक्टो.) रोजी राज्यस्तरीय मुस्लिम अधिवेशनाचे आयोजन सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत ताजबाग शरीफ सांस्कृतिक सभागृह नई सराय उमरेड रोड नागपूर येथे केले आहे.
या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून भारतीय मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक प्रबोधनवादी आंदोलनकारी व्यक्तिमत्व प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल ऋषीकर भारती हे राहतील. मुख्य अतिथी म्हणून प्राध्यापक रमेश पिसे विदर्भ अध्यक्ष रासपा, शकील पटेल नेता एम आय एम , हमीद इंजिनियर अध्यक्ष इमाम तजिम , अब्दुल गफार पाशा राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष आरएसएस , विश्वनाथ वाकडे अध्यक्ष बिरसा मुंडा संघटना, हाजी अन्वर अली अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती, तर विशेष अतिथी म्हणून प्राध्यापक माधव सुरकुंडे आदिवासी मुक्ती दल यवतमाळ, प्राध्यापक डॉक्टर केजी पठाणपुणे, मोसिन खान मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती लातूर, अश्रफ खान माजरी महासचिव भामुप, सलीम खान उत्तर नागपूर एम आय एम, प्रदीप मून समता सैनिक दल संजय बोरकर, अध्यक्ष भारिप आ.,संजय सटई ह्यूमन राईट अँड सोशल जस्टीस कमिशनर ऑफ इंडिया, अरुण कुमार नागबौद्ध उपाध्यक्ष राष्ट्रीय संयुक्त मोर्चा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमास विदर्भातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक डॉ ममता मून राष्ट्रीय महिला आघाडी प्रमुख संयुक्त मोर्चा, ताहिरा शेख पाशा महिला आघाडी प्रमुख भामुप, मिर्जा वाहक बॅग विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष भामुप गोंदिया,परवेज पठाण, गोंदिया भंडारा गडचिरोली चे आमंत्रक,सय्यद अफजल शहा उर्फ छन्नुभाई शहराध्यक्ष भामुप , मिर्झा मुजीब बेग प्रचार प्रमुख भारतीय मुस्लिम महाराष्ट्र राज्य आदींनी केले आहे.