लाखभर लोकांनी घेतली “बाल विवाह मुक्त भारत” करण्याची शपथ
गोंदिया प्रतिनिधी :-जिल्ह्यातील 198 गावे बालकांच्या सुरक्षितते साठी व बाल विवाह मुक्त भारत करण्यासाठी कॅन्डलच्या रोषणाईने झगमगले. शाळा, अंगणवाडी , ग्राम पंचायत , पोलिस विभाग, महिला नेतृत्व वर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.देशभरात सुरू असलेल्या “बालविवाह मुक्त भारत” मोहिमेचा एक भाग म्हणून (दि.16 ऑक्टो.) रोजी साजरा करण्यात आलेल्या बालविवाह मुक्त भारत दिनानिमित्त, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया ने 198 ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये लाखाच्या च्या जवळ पास सर्व वयोगटातील सर्व जाती धर्मातील महिला, मुले आणि सामान्य लोकांनी शपथ घेतली की ते बालविवाहाला पाठिंबा देणार नाहीत आणि खपवून घेणार नाहीत. या कार्यक्रमात पोलीस विभाग, गावातील पदाधिकारी, शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते. मा चिन्मय गोतमारे जिल्हाधिकारी गोंदिया, मा निखील पिंगळे जिल्हा पोलीस अधीक्षक, मा अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. देशभरातील राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण 5 (NHFS-2019-21) च्या आकडेवारीनुसार, 20 ते 24 वयोगटातील 23.3 टक्के मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न झाले होते. बालविवाह मुक्त भारत अभियान देशातील 300 हून अधिक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. 2030 पर्यंत भारतातून बालविवाह पूर्णपणे नष्ट करण्याच्या उद्देशाने संपूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेशी देशातील 160 संस्था जुडलेल्या आहेत. या मोहिमेला 16 ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. अशा रीतीने देशभरात हजारो बालविवाह थांबले आणि लाखो लोकांनी आपल्या गावात आणि वस्त्यांमधून आणि शहरांमध्ये बालविवाहाची प्रथा बंद करण्याची शपथ घेतली. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी गावागावात, पोलीस स्टेशन मध्ये दिवसभर रॅली, प्रत्येक शाळेत शपथ, समुदायामध्ये जनजागृती करणे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी लाखो लोकांनी 198 गावांमध्ये व पोलीस स्टेशन गोंदिया, रामनगर, तिरोडा, रावणवाडी येथे सुद्धा हातात कॅन्डल व दिवा घेऊन मोर्चा काढला व आणि लोकांना जाणीव करून दिली की, नव्या भारतात बालविवाहाला स्थान नाही. या रॅलीत पोलिस, शाळकरी मुले, ग्रामस्थ,यांच्यासह समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी झाले होते. यामध्ये गोंदिया जिल्हा बाल विवाह मुक्त झालाच पाहिजे याबाबत घोषणा देण्यात आले.
इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया चे संचालक अशोक बेलेकर म्हणाले,बालविवाह हा एक गुन्हा आहे ज्याने आपल्या समाजाला शतकानुशतके त्रास दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी समाज आणि सरकारने राज्य बालविवाहमुक्त करण्यासाठी दाखवलेली बांधिलकी आणि प्रयत्नांमुळे लवकरच अशा वातावरणाचा आणि प्रणालीचा मार्ग मोकळा होईल जिथे मुलांना अधिक सुरक्षित आणि सुरक्षित वातावरण मिळेल. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 4 महिन्यापासून कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशन सोबत इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी काम करत आहे.
इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी गोंदिया चे संचालक अशोक बेलेकर व जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, अमित बेलेकर कार्यक्रम समन्वयक, पुर्णप्रकाश कुथेकर समन्वयक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, कम्युनिटी सोशल वर्कर दीपमाला भालेराव, अमोल पानतवणे, दुर्गेश भगत, संतकला राहण्ग्डले, पृथ्वीराज वालदे, भाऊराव राउत, पुष्पा राहण्ग्डले, पोर्णिमा शहारे, भाग्यश्री ठाकरे, अनिता ठाकरे, ज्योती ठाकरे, बिन्देश्वरी मलिक, कुलदीप खोब्रागडे, किरण फुले, डिम्पल भरडे, यांनी गावपातळीवर कार्यक्रम अयोजोत केले.