शैक्षणिक

सडक अर्जुनी येथे संविधान सन्मान दिवस कार्यक्रमाचे आयोजन

सडक अर्जुनी प्रतिनिधी :- येथील संबोधी बौद्ध समाज कल्याण बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने स्थानिक संबोधी बौद्ध विहारात (शेंडा रोड, तहसील कार्यालयासमोर ) रविवार (दि.26 नोव्हें.) रोजी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान ‘संविधान सन्मान दिवस कार्यक्रम, बिरसा मुंडा जयंती व महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त ‘भारतीय संविधानिक नागरिकांचे हक्क व नवीन शिक्षण व्यवस्था व बहुजन युवा विद्यार्थ्यांची दुर्दशा व वर्तमान देशातील परिस्थिती यावर उपाय’ आणि ‘जीवनात संविधानात विद्यार्थ्यांचे महत्व ‘या विषयावर मार्गदर्शकांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय वंजारी व मुंबई येथील कस्टम विभागाचे जॉईंट डायरेक्टर अश्विनकुमार उके हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए. पी. मेश्राम, सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.