शैक्षणिक

रासेयो द्वारा गावा-गावात नवमतदार जनजागृती कार्यक्रम एन. एम. डी महाविद्यालयांचा स्तुत्य उपक्रम

गोंदिया – उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालय, एन. एम. डी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व राष्ट्रिय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सेजगाव सह परीसरातील गावा-गावात नवमतदार जनजागृती कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्या डाँ. शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात नुकतेच राबविण्यात आले.
रासेयो कार्यक्रम अधिकारी व समाजशास्त्र विभाग प्रमुख डाँ. बबन मेश्राम यांनी नवमतदारांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, या हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालयात व परीसरात नवमतदार नोंदणी अभियान आणि जनजागृती कार्यक्रम राबविला. यावेळी अप्पर तहसीलदार विशाल सोनवाने यांनी नवमतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रमुख उद्देश, निवडणूक प्रक्रिया, शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे जनजागृती विषयक विविध कार्यक्रम यांची माहिती दिली.एन. एम. डी महाविद्यालयाचे प्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शारदा महाजन यांनी मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, सशक्त, सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी मतदानाच्या टक्केवारी वाढीबरोबरच उमेदवार निवड गुणवत्ताही वाढली पाहिजे, असे मत व्यक्त केले.तसेच निवडणूक मंडळ अधिकारी डोमेश हत्तीमारे यांनी
शासनाच्या वतीने विद्यार्थांना शैक्षणिक कामकाजाकारिता देण्यात येणारे आणि अन्य नागरिकांना आवश्यक असलेले विविध दाखले, ते काढण्यासाठीची अर्जप्रक्रिया यांची माहिती दिली. वाणिज्य विभाग प्रमुख डाँ. रविन्द्र मोहतुरे यांनी नवमतदारांना मार्गदर्शन केले.तर सरपंच प्रमोद पटले यांनी भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क बहाल केला असून, मतदारांनी अधिक सजगपणे हा हक्क बजावला पाहिजे असे सांगितले. यावेळी रासेयो निवडणूक अँबिसिडर प्रफ्फुल उके, झामसिंग बघेले, सार्थक बोरकर, प्राची कटरे, गायत्री बनकर सह रासेयो स्वंयसेवक, गावकरी अधिक संख्येने उपस्थित होते.