अभुतपूर्व रॅली व भिमबुध्द जयघोषाने अर्जुनी शहर दुमदुमले
अर्जुनी मोर :- विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती अर्जुनी मोर येथे थाटात संपन्न झाली. डोळ्याचे पाळणे फेडावे असी अभुतपूर्व रॅली, भिमबुध्द जयघोषाने संपुर्ण अर्जुनी मोर. शहर दुमदुमले. एकता मंच व बौध्द समाज अर्जुनी मोर.च्या संयुक्त विद्यमाने १४ एफ्रिल ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात संविधान चौकातील संम्बोदी बुध्द विहारात भगवान बुद्ध, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. १३ एफ्रिल च्या रात्रौ १२ वाजता केक कापुन जयंती समारोहाला सुरवात करण्यात आली. १४ एफ्रिल ला सकाळ पासुनच परिसरातील बौध्द बांधवांमधे भिमजयंतीचा उत्साह संचारला होता. शुभ्रवस्र परिधान करुन महीला व पुरुषांचे जत्थे चे जत्थे महामानवाला अभिवादन करण्यासाठी शहरातील विवीध बुध्द विहारात जात होते.पंचशिल ध्वजारोहन बुध्दवंदना व २२ प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आले.अर्जुनी मोर.शहरात दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता पासुन जुन्या बसस्थानक चौकात अल्पोपहार व मठ्ठ्याचे वितरण करण्यात आले. सायंकाळी चार वाजता पासुन शहारे मोहल्ह्यातील मुख्य बुध्द विहारातुन विशाल धम्म रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन समता काॅलनी ते संविधान चौकापर्यंन्त विविध झाक्यासह फटाक्याचे आतिशबाजीत जयभिम च्या घोषणा सह अभुतपूर्व रॅली काढण्यात आली. रॅलीमधे हजारोच्या संख्येने महिला, पुरुष,युवा, युवती सामील झाले होते. धम्मरॅलीचा समारोप संविधान चौकातील संम्बोदी बुध्द विहारात करण्यात आला.यावेळी विवीध वक्त्यांनी बाबासाहेबांचे जिवनचरित्रावर प्रकाश टाकला. सायंकाळी धम्मभोजनानंतर आंबेडकरी चळवळीचे राष्ट्रीय धम्मप्रबोधनकार अनिरुध्द शेवाळे यांचा प्रबोधनात्मक भिमबुध्द गिताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. दिवसभरातील या अभुतपूर्व भिमजयंतीला हजारोच्या संख्येने भिमसागर उलटला होता.
विविध संघटना कडुन सरबत,पाणी,मठ्ठा,थंड फ्रुटीचे वाटप
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे औचित्य साधून शहरातील विविध मान्यवरांनी व संघटनांनी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, अल्पोपहार, मठ्ठा व थंड फ्रुटीचे वितरण केले.शहरातील आनंद वस्रालय,इंडियन गॅस,व उद्योगपती अशोक चांडक परिवारांचे सौजन्याने दिड ते दोन हजार लोकांना थंड फ्रुटीचे वितरण करण्यात आले. तर प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मठ्ठा वितरित करण्यात आला.