विदर्भ

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून अंगीकार करणे काळाची गरज सौ नलिनी चांदेवार यांचे प्रतिपादन

अर्जुनी मोर :- भारतीय संविधानाचे जनक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून अंगीकार करणे त्या सोबतच न्याय स्वातंत्र्य बंधुता समानता समाजात प्रस्थापित करण्यासाठी तसेच शोषित पीडित समाजाच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य याची जगात तोड नाही त्यांचे विचार अंगीकार करून आचरणात आणणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन ईसापुर ग्रामपंचायत च्या सदस्या सौ नलिनीताई चांदेवार यांनी केले त्या 14 एप्रिल रोजी सायंकाळी ईसापुर येथील सम्यक बौद्ध विहाराच्यावतीने आयोजित केलेल्या भीम जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या यावेळी उद्घाटक म्हणून माजी सरपंच तथा उद्योगपती लोचन चांदेवार पत्रकार संतोष रोकडे ज्येष्ठ नागरिक बळीराम गोंडाणे ओमदास गोंडाने विश्वकिरण गेडाम अनिल ठवरे व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी सरपंच लोचन चांदेवार पत्रकार संतोष रोकडे यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात येऊन पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पंचशीलाचे पठण करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कुमारी सुचिता गेडाम तर आभार प्रदर्शन सौ स्नेहल गेडाम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप गेडाम मिलिंद गेडाम रविंद्र गेडाम हसन गेडाम ओमदास गोंडाने सुजल ठवरे सरगम गेडाम सुरेश तिरपुडे व सौ.सुचिता ठवरे सौ.अर्चना गोंडाने सौ खुलाशा काणेकर सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांनी अथक परिश्रम घेतले