General

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देऊन जनजीवन फुलविले आहे… शुद्धोधन शहारे

गोंदिया :- पारतंत्र्यामध्ये माणसाला माणसाशी माणुसकीने वागण्याचे अधिकार नव्हते विषमतेमध्ये माणूस बरबटलेला होता. वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था माणसाला समान वागणूक देत नव्हती. अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला संविधान देऊन जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे व प्रगतीचे दिवस निर्माण केले व त्याचे
जनजीवन फुलविले आहे असे उद्गार सत्यशोधक, प्रबोधनकार व आंबेडकरी विचारवंत माननीय शुद्धोधन सहारे यांनी नियोजित कार्यक्रमात काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबुद्ध कोचिंग सेंटर गोंदिया येथे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली, त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीमती निशा गणवीर सचिव प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्था ह्या होत्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुदोधन सहारे सत्यशोधक, प्रबोधनकार व आंबेडकरी विचारवंत हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माननीय जनार्दन बडोले सेवानिवृत्त लेखा अधिकारी माननीय सिद्धार्थ मेश्राम सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, हरीणखेडे सर, बनसोड सर, कुमारी निधी सहारे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले नंतर स्वागत गीत व मान्यवरांचे मार्गदर्शन नाला सुरुवात झाली सहारे सरांनी शिक्षणाशिवाय तरनोंपाय नाही असे महात्मा फुले यांनी सांगितले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मंत्र दिला असून विद्यार्थ्यांनी ह्या दोन गुरूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यावे असे सांगितले. विशेष म्हणजे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

माननीय बडोले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन व कार्य यावर मार्गदर्शन केले मेश्राम सरांनी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीला उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गौरव खोब्रागडे यांनी मानले