General

जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात क्षयरोग संबधाने तब्बल 16270 लोकांनी निशुल्क एक्स-रे चा घेतला लाभ

घाबरु नका ! सतत दोन आठवड्यापेक्षा जास्तीचा खोकला असल्यास करा तपासणी थुंकी व छातीचा एक्स-रे ची

गोंदिया :- जिल्ह्यात आठही तालुक्यातील तब्बल चौदा खाजगी रुग्णालयात शासनामार्फत क्षयरोग संबधाने निशुल्क छातीचा एक्स-रे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मागील 2023-24 वर्षी तब्बल 16270 संशयित लोकांनी शासनाच्या निशुल्क एक्स-रे योजनेचा लाभ घेतला आहे.दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप व वजनात घट असलेले रुग्ण, खोकल्यातून रक्त पडणे अशा संशयित लोकांनी आरोग्य संस्था किवां जवळच्या आशा सेविका मार्फत आपल्या जवळच्या शासन संलग्न खाजगी रुग्णालयात जाऊन छातीचा एक्स-रे काढुन शासनेच्या योजनेचा फायदा घ्यावा.
-डॉ.अभिजीत गोल्हार , जिल्हा क्षयरोग अधिकारी ,गोंदिया

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत वेळोवेळी शासन मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येतात. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी व आशा सेविकामार्फत क्षयरोग संबंधाने जनजागृती व क्षयरूग्ण शोध मोहीम राबविवण्यात येत असते. उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका किंवा आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत लक्षणेनुसार क्षयरोग संबंधाने दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप व वजनात घट असलेले रुग्ण, खोकल्यातून रक्त पडणे अशा संशयित लोकांची गृहभेटी दरम्यान शोध मोहिम राबवुन आरोग्य संस्थेत ठ्सा तपासणी करित असतात तर व शासन संलग्न खाजगी रुग्णालयात क्षयरोग संबधाने छातीचा एक्स-रे काढण्यासाठी संदर्भित करत असतात तरी लोकांनी वरीलप्रमाणे कुठलेही लक्षणे आढळल्यास जागृत राहुन जवळील आरोग्य संस्थेत जावुन आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे.
गोंदिया जिल्ह्यात खालील 14 ठिकाणी शासन संलग्न खाजगी रुग्णालयात क्षयरोग संबधाने छातीचा एक्स-रे काढण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
डॉ.अमोल धुर्वे-धुर्वे नर्सिंग होम-तिरोडा
डॉ.घनशाम तुरकर-सोनो व्हु सेंटर- सिव्हील लाईन-गोंदिया
डॉ.प्रदिप जुळा- नवोदय हॉस्पीटल- देवरी
डॉ.शिरीष रत्नपारखी-रत्नपारखी नर्सिंग होम,कन्हारटोली-गोंदिया
श्री.सपन उजवणे-आमगाव डायग्नोस्टिक सेंटर-ता.आमगाव
डॉ.आदर्श अग्रवाल-एंजल डायग्नोस्टिक सेंटर-मनोहर चौक-गोंदिया
डॉ.विकास डोये- डोये क्लिनीक डिजीटल एक्स-रे सेंटर-ता.सालेकसा
डॉ.ए.के.कापगते-क्लिनीक डिजीटल एक्स-रे सेंटर-नवेगावबांध- ता.अर्जुनी मोरगाव
डॉ.संजय माहुर्ले- अवंती डायग्नोस्टिक सेंटर-गोंदिया
10) सडक अर्जुनी डिजीटल एक्स-रे सेंटर-ता.सडक अर्जुनी
11) डॉ.प्रिया खेमका अग्रवाल-श्रीशाम सोनोग्राफी सेंटर-दाभना रोड -अर्जुनी मोरगाव
डॉ.प्रिया खेमका अग्रवाल-श्रीशाम सोनोग्राफी सेंटर-देवरी चिचगड–पोलिस स्टेशन रोड ता.देवरी

13) प्रिया डीजीटल एक्स रे व डायग्नोस्टिक सेंटर- ठाणा रोड-गोरेगाव
14)गोंदिया येथील ऑरेंज डिजीटल सर्व्हीसेस एक्स-रे व्हॅन गोंदिया
ई.वरील प्रमाणे जिल्ह्यात 14 ठिकाणी क्षयरोग संबधाने छातीचा एक्स-रे काढुन टि.बी.फ्री ईंडीया या शासनाच्या धोरणाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी या प्रसंगी केले आहे. तसेच सर्व शासकिय आरोग्य संस्था जसे जिल्हा क्षयरोग केंद्र, के.टी.एस. सामान्य रुग्णालय गोंदिया,बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया,उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, सर्व ग्रामीण रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे निशुल्क ठसा तपासणी करण्यात येत असल्याची माहीती जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देव चांदेवार यांनी दिली आहे.