शैक्षणिक

शिष्यवृत्ती परीक्षेत जयदुर्गा विद्यालय गौरनगरच्या विद्यार्थ्यांची उंच भरारी

24 पैकी 22 विद्यार्थी ठरले पात्र

अर्जुनी मोरगाव :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये श्री गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी मोरगाव द्वारा संचालित जयदुर्गा विद्यालय गौरनगर चे 24 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामध्ये 22 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले.
फेब्रुवारी 2024 मध्ये पार पडलेल्या परीक्षेमध्ये वर्ग आठवीचे विद्यार्थी वीरेंद्र वैद्य, फनींद्र सरकार, निकिता सरकार, निशा मिस्त्री, रिया मंडल,पल्लवी सरकार, अंकिता तरुवा,बिंदिया सरकार, चांदनी मिस्त्री, दुर्गा सरकार, इशिका बारई ,कृष्णा सरकार, प्रिया सरकार,जगन्नाथ सरकार,जितेश गाईन,राज सरकार, मोहन सरकार, नैतिक सरकार,नमन कमलेश सरकार, प्रेम सरकार, नमन धनंजय सरकार, विक्रम स्वर्णकार हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य सुनील कुमार पाऊलझगडे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख कांतीकुमार बोरकर, धीरज सरकार वर्गशिक्षिका वैशाली कळपते तसेच पालकांना दिले.
संस्थेचे अध्यक्ष अशोक मोहनलाल चांडक, संस्था सचिव डॉ राजेश चांडक तसेच सरपंच विकास वैद्य यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले आहे.