General

प्रत्येक व्यक्तीने पंचशीलाचे पालन करावे . आ.मनोहर चंद्रिकापुरे

खंबी येथे बुद्ध जयंती कार्यक्रम उत्साहात

अर्जुनी मोरगाव :- बौद्ध धर्मामध्ये कर्म हा मुख्य बिंदू आहे. त्यामुळे आपल्या हातून कुठलेही कार्य घडून येत असताना ते कार्य उत्तम कसे समजले जाईल याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. बौद्ध धर्मामध्ये तथागतांनी जे पंचशील आपल्याला दिले आहेत. त्याकडे सुद्धा दुर्लक्ष न करता प्रत्येक व्यक्तीने पंचशीलाचे पालन करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील खांबी येथे बुद्ध जयंती कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.यावेळी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथीं च्या हस्ते करण्यात आले. तसेच आमदार मनोहर चंद्रिकापुरे, व सामाजिक कार्यकर्ता प्रमोद डोंगरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच निरुपमा बोरकर,माजी उपसरपंच प्रमोद भेंडारकर,देवानंद रामटेके,विजुभाऊ लोणारे, रविचंद फुंडे, शिवराज रामटेके ,छगन लोणारे ,भाऊदास डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी मुनिस्वर्, शालुबाई खोब्रागडे, प्रियंका रामटेके बुद्ध विहाराचे अध्यक्ष नूतन मेश्राम, उपाध्यक्ष नरेंद्र बोरकर,किशोर बोरकर,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन योगेश लोणारे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले