जी.एम.बी. इंग्लिश मिडीयम हायस्कूल ने राखली गुणवत्तापूर्ण 100 टक्के निकालाची परंपरा
अर्जुनी मोरगाव:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक 27 मे 2024 ला जाहीर करण्यात आला. यात अर्जुनी मोरगाव येथील श्रीमती केशरबाई शिक्षण संस्थाद्वारा संचालित जी.एम.बी इंग्लिश मीडियम हायस्कूल विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून कु. आचल विनायक पुस्तोडे 98.40 टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम तर साहीली कृष्णा बनपुरकर 95.40 टक्के गुण घेऊन शाळेतून द्वितीय, शौर्या ओमप्रकाशसिंह पवार 94.20 टक्के गुण घेऊन शाळेतून तृतीय.
जी. एम.बी. हायस्कूल मधून एकूण 93 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी गुणवत्ता प्राप्त 17 विद्यार्थी प्रयांक रवींद्र मेश्राम 94.00%, वंशिका सुधीरकुमार राऊत 93.80%, सुशांत परमानंद मेश्राम 93.20%, आर्यन प्रमोद कोरे 93.00% भाग्यश्री खुशाल नाकाडे 92.60% कृतिका कुंडलिक लोथे 92.60%, हिमांशी आशिष जेठवा 91.60%, धवल कांतिकुमार बोरकर 91.40%, शर्वरी सनतकुमार वाढई 91.20%, प्रज्ञा सुरेंद्र खोबरागड़े 91.00%, उन्नति सुनील गोलदार 91.00%, तोषित लीलाधर भूते 90.80%, युक्ता ईश्वरचंद पालीवाल 90.80%, काव्य रोशन गोंडाने 90.20%.प्रविण्याप्रप्त 59 प्रथमश्रेणी विद्यार्थी 14, द्वितीयश्रेणी 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेतील सर्व गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा, संस्थाध्यक्ष जयप्रकाश भैय्या,संस्था सचिव सर्वेश भुतडा, समन्वयक भगीरथ गांधी, प्राचार्या शैव्या जैन, प्राचार्य जे .डी.पठाण, उप प्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल, प्रा. टोपेशकुमार बिसेन, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.