शैक्षणिक

रोहिणीला डॉक्टर बनून करायची रुग्णसेवा जी प हायस्कूल मधून आली पहिली मिळविले ९४.८० टक्के गुण

सडक अर्जुनी :- ग्राम कोदामेडी निवासी रोहिणी आसाराम लांजेवार हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९४.८० टक्के गुण प्राप्त करून शाळेतून पहिली आली आहे.शाळेचा एकूण निकाल ९८.७१ टक्के असून प्रावीण्य श्रेणीत ३८ , प्रथम श्रेणीत २९ तर द्वितीय श्रेणीत १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. समाजशील शिक्षक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांनी आज रोहिणी आसाराम लांजेवार मु कोदामेडी येथे घरी जाऊन आईवडील यांचे उपस्थितीत रोहिणी चा सत्कार केला.सत्कार प्रसंगी महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ, पेन, गुलाबपुष्प आणि मिठाई भरवून अभिनंदन केले.या प्रसंगी रोहिणीचे आई बाबा उपस्थित होते.रोहिणीला शुभेच्छा देऊन संवाद साधला असता तीने पुढे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचा मानस व्यक्त केला.दहावीत मिळालेले यश समाधानकारक आहे असे सांगितले.यासाठी नियमित पाच सहा तास अभ्यास करून यश संपादन केले.माझ्या यशात आई बाबा,माझे गुरुजनांचा वाटा आहे.या पुढेही मेहनत घेऊन अभ्यास करून डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचा संकल्प आहे असे सांगितले. मेश्राम यांनी अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि आईवडील यांचे अभिनंदन केले.