सरस्वती विद्यालयाने राखली गुणवत्तापुर्ण १०० टक्के निकालाची परंपरा एस.एस.सी.परिक्षेत कु. लिना हरिष ढोमणे तालुक्यातून द्वितीय
प्रतिनिधी, भंडारा/गोंदिया:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सन २०२४ मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल सोमवार दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारच्या सुमारास जाहीर करण्यात आला. यात अर्जुनी मोर. येथील सरस्वती विघालयाचा निकाल १००टक्के लागला असून कु. लिना हरीष ढोमणे ९७टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून द्वितीय तर मृणाल सोपान बगमारे ९५.८० टक्के प्राप्त करून विघालयातून द्वितीय तर कु. माधवी राजेश कोवे ९५.४०टक्के गुण प्राप्त करून विघालयातून तृतीय ठरली आहे. सविस्तर माहिती अशा प्रकारे आहे कि, गोंदिया जिल्ह्यातील नामांकित शिक्षण क्षेत्रातील सरस्वती विद्यालयातून एकूण १७२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी गुणवत्ता प्राप्त १८ विद्यार्थी, प्रावीण्यश्रेणीत ७६, प्रथम श्रेणीत ५७, द्वितीय श्रेणीत १७,व पास श्रेणी०४, विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निधी पदमाकर कोरे ९५.०० भावेश हेमंत मुंगुलमारे ९४.२० स्नेहल निशिकांत रामटेके ९२.४० देवश्री अशोक मस्के ९२.४० वैष्णवी नरेंद्रनाथ नाकाडे९२. ४० आयुषी तीर्थराज पटले
९२.२० भवन राजेश हटवार ९२.२० पियुष प्रकाश निमजे ९२.०० पूर्वा राजेंद्र नाकाडे ९१.६० स्नेहा वामन नाईक ९१.४० राशी यशकुमार शहरे ९१.४० तन्मय सिद्धार्थ जांभुळकर ९१.२० युगांत अनिल हुकरे ९०.४० सान्वी यशवंत खंडाईत ९०.४० कुणाल सेवकराम लंजे ९०.४० शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थी व यशवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा. डॉ. बल्लभदास भुतडा , मा.संस्था सचिव सर्वेश भुतडा, केशरबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. जयप्रकाश भैय्या , प्राचार्य पठाण सर, उपप्राचार्य मा. घाटे मॅडम,
पर्यवेक्षक मा. पालीवाल सर, मा. जैन मॅडम , मा. गांधी सर, मा. बिसेन सर, मा. भुते मॅडम, शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन व गोड कौतुक केले व पेढा भरवून त्यांना शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या तसेच पालकांचे सुद्धा अभिनंदन केले.