शेकडो वर्षाचा अंधकाराचा अंत म्हणजे भिम जयंती
भंडारा- शुभ्र पांढरे धवल वस्त्र परिधान करून, हाती निळे झेंड घेत आणि जय भिमचा एकच जयघोष करताना लोकं दिसली, म्हणजे भिम जयंतीचा महोत्सव सुरू आहे, एवढं स्पष्ट होतं. केवळ देशभरातच नाही, तर अवघ्या विश्वभरातच भारतीय राज्यघटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी मोठ्या दिमाखदार स्वरूपात जयंती साजरी केली जाते.
शेकडो वर्षांचा अंधकाराचा अंत : शुभ्र पांढरे धवल वस्त्र परिधान करून, हाती निळे झेंड घेत आणि जय भिमचा एकच जयघोष करताना लोकं दिसली, म्हणजे भिमजयंतीचा महोत्सव सुरू आहे, एवढं स्पष्ट होतं. केवळ देशभरातच नाही, तर अवघ्या विश्वभरातच भारतीय राज्यघटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी मोठ्या दिमाखदार स्वरूपात जयंती साजरी केली जाते.
शेकडो वर्षांचा अंधकाराचा अंत म्हणजे भिम जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. आज एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येणाऱ्या या भिम जयंतीचा उत्सव नक्की कधीपासून सुरू झाला? कुठे सुरू झाला ? मुख्य म्हणजे कोणा सुरू केला? असा प्रश्न आपल्याला नक्कीच कधी ना कधी पडलेला असेल. याच गोष्टीचा प्रो. डाँ. बबन मेश्राम, समाजशास्त्र विभाग प्रमुख, एन. एम.डि काँलेज गोदिया यांनी संकलन करुन वाचकांसाठी घेतलेला हा आढावा..म्हणजे भिम जयंती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव कुठे साजरा झाला? असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला वाटत असेल की, नक्कीच मुंबई, नागपूर, महू, इत्यादी शहरांचा विचार आपल्या मनात आलाच असेल.
मात्र तसे अजिबात नाही. चळवळींची आणि परिवर्तनाची भूमी म्हणून ओळखली जाणाऱ्या पुण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
डॉ. आंबेडकर यांचा सर्वप्रथम वाढदिवस पुणे शहरात १४ एप्रिल १९२८ रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला. यामुळे ते या जन्मदिवसाचे म्हणजे भीम जन्मोत्सवाचे समारंभाचे ते शिल्पकारच ठरले.
ही प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकीच्या पत्र विभागात दलित मंडळाचे अध्यक्ष असताना, जयंतीच्या औचित्य साधत, त्यांनी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा चक्कं हत्तीच्या अंबारीत ठेवली होती. यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होती .जुन्या काळातील थोर सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख जनार्दन सदाशिव रणपिसे यांची आहे. रणपिसे यांचा जन्म सासवड येथे २४ ऑगस्ट १८९८ या साली झाला. ज्या काळात दलितांनी शिक्षण संपादन करणेच एक मोठे दिव्य होते, अशा काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले. यातच त्यांचे मोठेपण आहे. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन, त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे अध्ययन केले. १९१८ ते १९२१ या तीन वर्षात त्यांनी सन्मार्ग दर्शक मंडळाची स्थापना केली. सामाजिक सभा, संमेलने व्याख्याने, नाटके प्रौढांकरता रात्रीचे शिक्षण वर्ग चालवले. सोबतच व्यायामशाळा काढून तरूण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
विशेष म्हणजे, महार सेवादलाची त्यांनी स्थापना केली. या दलाचे कमांडर इन चीफ बनले. राजकारण ते फारसे सक्रिय राहिले नाहीत. पण, सामाजिक कार्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्याकाळात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र तीन हजार रुपये, तसेच प्रेस फंड पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी पुण्यात युवक परिषद भरवली होती. ही परिषद फक्त पुणे शहर किंवा जिल्ह्यासाठी मर्यादित नव्हती. यात तेव्हाच्या मुंबई प्रांतभरातून प्रतिनिधी आले होते. १९३९ च्या कायदे मंडळात चौदा ही प्रतिनिधी निवडून आले, याचे श्रेय अर्थातच रणपिसे यांचेकडे ओघानेच जाते.
महात्मा गांधी यांनी पुण्यात उपोषण सुरू केले होते. या दरम्यान बाबासाहेब पुणे शहरात येणार होते. त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता. त्यावेळी रणपिसे यांनीच यात मोलाची कामगिरी बजावली होती. विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नोकरी करत होते. अशा रीतीने ते एक समाजसेवाच वसाच घेतला होता.
1918 ते 1921 या काळात जनार्दन रणपिसे यांनी ‘सन्मार्ग दर्शक मंडळ’ स्थापन केले. या मंडळामार्फत त्यांनी सामाजिक सभा, नाटके आणि व्याख्याने आयोजित केली. जे प्रौढ लोक दिवसा काम करायचे, त्यांच्यासाठी त्यांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. तरुणांमध्ये नवचैतन्य आणि शारीरिक ताकद निर्माण व्हावी म्हणून त्यांनी व्यायामशाळाही काढल्या. त्यांच्या या कार्यामुळे खडकी परिसरातील तरुण मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीकडे ओढले गेले.
त्यांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी ‘महार सेवादलाची’ स्थापना केली आणि ते स्वतः या दलाचे ‘कमांडर इन चीफ’ बनले. जनार्दन रणपिसे हे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, पण पडद्यामागे राहून त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी जे योगदान दिले, ते मोलाचे आहे. बाबासाहेबांच्या अनेक सभा पुण्यात घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा कार्यकर्ता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे सामाजिक लढे लढत होते, त्यासाठी पैशांची नितांत गरज असायची. अशा वेळी जनार्दन रणपिसे यांनी पुढाकार घेऊन बाबासाहेबांना 3,000 रुपयांचे मानपत्र आणि ‘प्रेस फंड’ म्हणून 5,000 रुपये गोळा करून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. इमारत फंड जमा करण्यातही त्यांचा पुढाकार होता.
तुम्हाला पुणे करार आठवत असेल? महात्मा गांधींनी पुण्यात उपोषण सुरू केले होते आणि त्या कठीण काळात बाबासाहेब पुण्यात आले होते. तेव्हा बाबासाहेबांचा मुक्काम पुण्याच्या ‘नॅशनल हॉटेलमध्ये’ होता. त्या तणावपूर्ण वातावरणात बाबासाहेबांची सर्व काळजी घेण्याचे आणि सुरक्षिततेचे काम जनार्दन रणपिसे यांनी सरकारी नोकरी सांभाळून चोखपणे बजावले होते. त्यांनी बाबासाहेबांना सुरक्षितपणे सभेच्या ठिकाणी पोहोचवणे आणि पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी आणणे यासाठी ‘महार सेवादला’च्या कार्यकर्त्यांचा गराडा उभा केला होता.
एक विचार जो आज जागतिक सण बनला!
आज जेव्हा आपण 14 एप्रिलला डीजेच्या तालावर किंवा लेझीमच्या तालावर नाचताना पाहतो, भव्य देखावे पाहतो, तेव्हा आपण जनार्दन सदाशिव रणपिसे यांचे आभार मानले पाहिजेत. 14 एप्रिल 1928 रोजी पुण्याच्या खडकीत त्यांनी लावलेले हे एक छोटेसे रोपटे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच आज आपण आपल्या महामानवाचा उत्सव इतक्या अभिमानाने साजरा करू शकत आहोत.
रणपिसे यांनी सुरू केलेली ही भीम जयंतीची प्रथा नुसती एक परंपरा राहिलेली नाही, तर ती आज शोषितांसाठी, वंचितांसाठी एक ऊर्जा देणारा स्त्रोत बनली आहे. आजच्या पिढीने हा इतिहास केवळ वाचून सोडून न देता, तो समजून घेतला पाहिजे आणि पडद्यामागच्या खऱ्या नायकांच्या कार्याला नेहमी उजाळा दिला पाहिजे.
