General

जनसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या -जि प सदस्य संजय टेंभरे यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम 

_पंचायत समितीच्या सभागृहात घेतला विविध योजनांचा आढावा 

 

गोंदिया _ ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाच्या वतीने अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जात असल्या तरी त्याची माहिती ग्रामीण भागात योग्यरित्या पोहोचविली जात नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी अशा वैयक्तिक लाभाच्या योजनेपासून वंचित राहतात. तसेच ग्रामीण भागातून कार्यालयात आलेल्या जनसामान्यांना योग्य ती माहिती न देता त्यांना त्रास दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांपर्यंत वैयक्तिक योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवून जास्तीत जास्त लाभ जनसामान्य जनतेला मिळावा, तसेच त्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे नियोजन करा, असे अल्टिमेटम जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी केले.

पंचायत समिति गोंदियाच्या सभागृहात दिनांक 9 जानेवारी रोजी आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय टेंभरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचाआढावा घेताना संबंधितांना निर्देश दिले.

फूलचूर जिला परिषद क्षेत्र अंतर्गत ग्राम पंचायतीमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावी पणाने राबविल्या जात नसल्याचे लक्षात आल्याने 26 जानेवारी रोजी होणा-या ग्राम सभेमध्ये रोजगार हमी योजना अंतर्गत रस्ते खडिकरण,सीमेंट रस्ते, तलावाची कामे, पांदन रस्ते , सिंचन विहिर,भातखाचर ,वृक्ष लागवड, गुरांचा गोठा, शेळीपालन शेड, पोल्ट्री शेड, पशुपालना साठी शेतकरी बांधवाना योजनाची माहिती, सेंद्रिय खत टाकी बांधकाम, कृषि गोदाम बांधकाम ,शाळेत भौतिक सुख सुविधा, खेळाचे मैदान, पेव्हिंग ब्लॉक लावणे, घरकुलची किस्त तात्काळ टाकणे ,घरकुलची अपूर्ण कामे पूर्ण करणे, वैयक्तिक शौचालयाचे तात्काळ निधी वितरण करणे, आंगनवाड़ी सौंदर्यीकरण करणे आदी विषयावर सखोल चर्चा करण्यात येऊन आढावा घेण्यात आला.

26 जानेवारीच्या ग्रामसभेच्या आधी गावामध्ये दवंडी देवुन जनतेपर्यंत माहिती पोहोचविणे,

जनतेचे अर्ज़ मागविणे व त्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. ग्रामीण भागातून आलेल्या जनसामान्यांना योग्य ती माहिती उपलब्ध करून द्या, कोणत्याही कर्मचाऱ्याने हयगय केल्यास कार्यवाही केली जाईल, असा अल्टिमेटम ही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी देवरे,, सीडीपीओ, नरेगा एपीओ राहंगडाले, शाखा अभियंता, करुणा डोंगरे, विस्तार अधिकारी चिंधालोरे, रामटेके, यांत्रिकी विभाग गोंदियाचे अनमोल मेश्राम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्या स्नेहा गौतम, पंचायत समिती सदस्य उपेंद्र उपराडे, फुलचूर सरपंच मिलन रामटेके, कारंजा सरपंच कापसे, लक्ष्मी निरवीकार माजी सरपंच, रामेश्वर चौरागडे माजी सरपंच,भारतीताई गांवडे,हिरालाल टेंभरे माजी सरपंच,अजयभाऊ राहंगडाले, जयचंद भाऊ पारधी,कुवरभाऊ येळे, देवेन्द्र भाऊ टेभंरे,हेमुभाऊ टेभंरे, सुनील गराकाटे,दिपकभाऊ हरिणखेडे,उमेशभाऊ पारधी,आनंदभाऊ मेश्राम,अलकाताई रंगारी, कन्हैया भाऊ रहमतकर,लोकेशभाऊ ऊपराडे,मुकेवभाऊ ऊपराडे,अशोकभाऊ चनने, निहालचंद्र भाऊ पारधी, घनश्याम भाऊ चौधरी, दुर्गा भाऊ कुरजेंकर, संतोष भाऊ राहंगडाले, दुलीचंद भाऊ कटरे, डॉ कुदंन मेश्राम , डॉ सोनाली गौतम, मुन्ना भाऊ राणा,पेमेद्र तुर्क,भाविकाताई रंगारी, आम्रपालीताई ऊके,सुरेशभाऊ पारधी,राजेश पंधरे, महेंद्र शहारे, नरेश भाऊ चौधरी,महेंद्र रहांगडाले, सुरेंद्र दमाहे, नागपुरे,गिरीपुजे, दुर्गेश येलसरे आदि उपस्थित होते.