General

शिव मंदिरात श्रीराम कथे सहित विविध कार्यक्रमांचे होणार आयोजन..! 

गोंदिया :- चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने हर हर महादेव शिव मंदिर बसंत नगर गोंदिया येथे दिनांक 19 मार्च ते 27 मार्च दरम्यान शिव मंदिर जीर्णोद्धार व श्रीराम जानकी प्राणप्रतिष्ठा महोत्सव श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान एकोणवीस तारखेला सकाळी दहा वाजे बस स्टॉप च्या समोरून कलश यात्रा व जलदिवास कथा ची सुरुवात होईल. पुढे आयोजित कार्यक्रमानुसार अन्नदिवास, रामजन्मोत्सव, दिव्य स्थान प्राणप्रतिष्ठा महोत्सव, श्री सिताराम विवाह महोत्सव, रामराज्य अभिषेक व हवन पूजन, महाप्रसाद यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सदर कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष सचिन गोविंद भाऊ शेंडे बंधू परिवाराने केले आहे.