महाविकास आघाडीकडूनभंडारा -गोंदिया विधान परिषदेसाठी माजी आमदार दिलीप बनसोड यांचा उमेदवारी अर्ज दाखल तर प्रफुल अग्रवाल यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, काँग्रेसची मोठी रणनीती, 1992 च्या विधान परिषद निवडणुकीप्रमाणे उलटफेर होण्याची शक्यता, महायुतीसमोर काँग्रेसचे कडवे आव्हान, प्रफुल अग्रवाल आपल्या वडीलप्रमाणे कमाल करणार काय?
मुंबई /भंडारा – (उदय चक्रधर/श्लोका पाटील) आगामी भंडारा/गोंदिया जिल्हा (स्थानिक स्वराज्य संस्था) विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माज. आमदार श्री. दिलीपजी बन्सोड यांचा नामनिर्देशन अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे भरण्यात आला यावेळी आमदार नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे, गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, मोहन पंचांभाई, राधेलाल पटले आदी उपस्थित होते. तर दरम्यान प्रफुल अग्रवाल यांनी भंडारा गोंदिया विधान परिषदेकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा त्यांच्या सोबत आमदार नाना पटोले अशोक गप्पू गुप्ता,महिला काँग्रेसीच्या बोरकर उपस्थित होत्या
भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या लक्षात घेता ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपसाठी ही जागा जिंकणे म्हणजे विदर्भातील आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची संधी ठरणार आहे.या मतदारसंघात ४५७ मतदार असून महाविकास आघाडीपेक्षा जवळपास १०० मतदार भाजप महायुतीकडे अधिक असल्याने निवडणुकीचा निकाल महायुतीच्या पारड्यातच स्पष्ट दिसून येत आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जागेचा निकाल केवळ एक विधानपरिषद सदस्य निवडण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो भविष्यातील राजकीय दिशा आणि जनाधाराचे संकेत देणारा ठरू शकतो. त्यामुळेच प्रत्येक निर्णय अत्यंत मोजून-मापून घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नाना पटोले यांनी म्हयुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याचे बोलले जात असून काँग्रेसकडून दिलीप बनसोड यांना मैदानात उतरविले तर अपक्ष उमेदवार म्हणून प्रफुल अग्रवाल यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलं यात मोठी रणनीती असल्याची चर्चा असून ही विधान परिषदेची निवडणूक महायुतीच्या उमेदवाराला सोपी जाणार नाहीं यात शंका नाहीं. ज्याप्रमाणे 1992 मध्ये माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे विधान परिषद निवडणूक अपक्ष लडवून जिंकून दाखवून राजकीय भाष्याकराचे तोंड बंद केले होते त्याचप्रमाणे 2026च्या निवडणुकीत आपल्या वडिलांप्रमाणे प्रफुल अग्रवाल देखील कमाल करतील काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. महाविकास आघाडीने मात्र महायुतीसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. तेव्हा 1992च्या विधान परिषद निवडणुकीत जो उलटफेर निकाल लागला होता तेव्हा ह्याही वेळी लागला तर नवल मानू नये.
