राज्यसभेचे सदस्य म्हणून राजेंद्र जैन यांनी घेतली शपथ; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
नवी दिल्ली | प्रतिनिधी (दि.29)
संसद भवन, नवी दिल्ली येथे देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांनी राज्यसभा सदस्यत्वाची पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या संसदीय प्रतिनिधित्वात आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला गेला.
शपथविधीनंतर खासदार राजेंद्र जैन यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून राज्यसभा सदस्य म्हणून यशस्वी आणि लोकहितवादी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी देशाच्या लोकशाही परंपरेला अधिक बळकटी देत जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारे कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, विविध लोककल्याणकारी प्रश्नांना संसदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि राज्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान देण्यासाठी राजेंद्र जैन यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्यसभेतील त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख भूमिका निभावावी, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आमदार परिणय फुके, आमदार राजूभाऊ कारेमोरे , आमदार अविनाश ब्राह्मणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश अधिक सुनील फुंडे, विनोद जैन, धनंजय दलाल, सुनील जैन, गजराज जैन, अरुण काला, देवेंद्रनाथ चौबे, सुमित हेडा अनेक राजकीय नेते, पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते.
