महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या राज्य सहसचिव पदी आशिष प्र. रामटेके यांची निवड
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय बैठक दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे संपन्न झाली असून सदर बैठकीमध्ये नवीन राज्य कार्यकारणी गठीत करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच राज्य अधिवेशन दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी आमदार निवास नागपूर येथे घेण्यात आले असून सदर अधिवेशनामध्ये नवीन राज्य कार्यकारणी गठीत करण्याचे अनुषंगाने निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. सदर निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबई नागपूर विभाग च्या सहसचिवपदी सदर संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष श्री.आशिष प्र. रामटेके यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. श्री आशिष प्र रामटेके हे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे देखील राज्य सहसचिव या पदावर कार्यरत असून जुनी पेन्शन योजना विषयक लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांनी संपूर्ण नागपूर विभागात जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतच्या लढ्याचे प्रतिनिधित्व करून शासनापुढे संघटनेची भूमिका मांडली आहे. त्यामुळे सदर नियुक्तीचे अनुषंगाने महसूल विभागाकडून तसेच राज्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून देखील सर्व कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तसेच भविष्यात पेन्शनसाठी लढायला आणखी उग्ररूप निर्माण होण्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सदर नियुक्ती बाबत श्री रामटेके यांचे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबई चे राज्य अध्यक्ष श्री जीवन अहिर, श्री किशोर हटकर सरचिटणीस, श्री लक्ष्मण नरमवार कार्याध्यक्ष, विभागीय अध्यक्ष नागपूर विभाग तसेच राज्य समन्वयक श्री राजूभाऊ धांडे, श्री देवेंद्र शिंदोडकर जिल्हाध्यक्ष नागपूर, श्री शैलेश धात्रक जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, श्री चंदू प्रधान जिल्हाध्यक्ष गडचिरोली, श्री शिवशंकर साखरवाडे जिल्हाध्यक्ष भंडारा, श्री राकेश डोंगरे जिल्हा सरचिटणीस गोंदिया, इत्यादींनी शुभेच्छांच्या वर्षाव केलेला आहे.