Tuesday, June 2, 2026
Latest:
General

कर्तव्यदक्ष, जनतेच्या सेवेसाठी तत्पर पोलीस उपनिरीक्षक मयुरी नागदिवे यांचे कौतुक

राजु फुंडे प्रतिनिधी, सालेकसा :-सालेकसा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. मयुरी नागदिवे या आपल्या प्रामाणिक कार्यशैली, कर्तव्यनिष्ठा व जनसामान्यांप्रती असलेल्या संवेदनशील वागणुकीमुळे नागरिकांमध्ये विशेष ओळख निर्माण करत आहेत.

कायद्याचे पालन, गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून त्यावर योग्य तोडगा काढण्याची त्यांची कार्यपद्धती प्रशंसनीय मानली जात आहे. सालेकसा परिसरात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षित वातावरण टिकवून ठेवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.

पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना कठोर शिस्तीसोबतच मानवतेची जाणीव ठेवून काम करणाऱ्या मयुरी नागदिवे यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. नागरिकांशी सौजन्यपूर्ण संवाद, महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली सालेकसा पोलीस स्टेशनचे कामकाज अधिक प्रभावीपणे सुरू असून, नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास वाढताना दिसून येत आहे. अशा कर्तव्यदक्ष, मेहनती व जनहितासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मयुरी नागदिवे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.