बिबट्या परत आला..! परिसरात भीतीचे वातावरण वनविभागाची शोध मोहीम सुरू
गोंदिया :- शहरातील गणेश नगर परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर असल्याची बाब पुढे आली आहे. विश्वसनीय सूत्रा कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे याविषयी मागील आठ दिवसापासून सदर बिबट हा परिसरात फिरत असल्याची माहिती असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाने त्यांच्या पथकांसहित शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान या परिसरात मागील आठवड्यात त्याने एका शेळीच्या बछड्याला पकडले असता परिसरातील कुत्र्यांनी आरडा ओरड केल्यानंतर तिथून बिबट्याने पळ काढला तर दोन दिवसांपूर्वी दोन जंगली डुकरांचा देखील शिकार केल्याची माहिती मिळाली आहे.
मागील आठ दिवसापासून वनविभाग त्याच्या मागावर असून अद्याप त्यास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले नाही. दरम्यान गौरी नगर गणेश नगर या क्षेत्रात राहणाऱ्या राहणाऱ्या रहिवासींच्या मनात भीतीदायक वातावरण बनले आहे. वारंवार होत असलेल्या घटनांचा आढावा घेत वन्य प्राण्यांचा वावर हे वन विभागासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब ठरू लागली आहे. वनविभाग याविषयी काही ठोस कारवाई करणार का याकडे आता जनतेच्या नजरा लागले आहेत. मागील काही महिन्यापूर्वी सुद्धा त्याच परिसरात बिबट्याने धुमाकूळ माजवला होता. गणेश नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापर्यंत धाव घेऊन संपूर्ण शहरात परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी जनतेने सहकार्य करून वन विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करीत आवश्यक ती मदत करावी ज्याच्या मदतीने कोणतीही दुर्घटनात्मक बाब घडणार नाही तसेच कोणत्याही जीवितस हानी होणार नाही या बाबींची दक्षता घेणे अधिक गरजेचे आहे.
