बिबट्याने केला शेळीचा शिकार आमगाव तालुक्यातील नागरिकांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास..!
गोंदिया :- आमगाव तालुक्यातील तालुक्यातील कुंभार टोली, परिसरात बिबट्याचा वावर आढळला असून परिसरातील जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या घरी शेळीवर हमला करून तिची शिकार केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून एन धान कापणीच्या वेळी शेतात बिबट्या असल्यामुळे मळणीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना भीतीमुळे शेतीत काम करणे जोखीममेचे झालेले आहे. या घटनेबाबत अधिकृत माहितीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव आखरे यांना संपर्क साधला असता त्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन दिवसापासून सदर बिबट्या हा परिसरात वावर करत असून यापुढे एखादी शिकार झाल्यास ती बातमी नवीन वाटू नये एवढेच. नुकतीच तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील महिलेवर जीव घेणे हल्ल्याची घटना ताजी असताना आमगाव परीक्षेत्रात सुद्धा बिबट्याचा वावर वाढल्याने जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या वावरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन असह्य बनले आहे. दरम्यान सुरक्षितता बाळगण्याच्या अनुषंगाने वन विभागाचे बचाव पथक कार्यरत असून कोणतीही जीवित हानी होऊ नये अशी आस स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
