चौथे अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन साहित्य संमेलन नागपूरात
नागपूर, प्रतिनिधी
साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडवून समाजात मानवतावादी मूल्य निर्माण करून परिवर्तनवादी वैचारिक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने “मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था”अर्जुनी/मोरगाव जिल्हा/गोंदिया गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच साहित्यिक क्षेत्रात सुध्दा कार्यरत असून” चौथे अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन साहित्य संमेलन १० जानेवारी २०२७ नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.
आतापर्यंत तीन साहित्य संमेलन राष्ट्रीय स्थळावर उत्तमरीत्या पार पडले.चौथे अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन साहित्य संमेलन १० जानेवारी २०२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन आवडेबाबू चौक लष्करी बाग नागपूर, मध्ये आयोजित करण्यात येत आहे.सामाजिक जाणीव आणि वैचारिक प्रबोधनाच्या सुंदर संगम घडविणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये कवीसंमेलन, परिसंवाद, साहित्य चर्चाक्षेत्र, साहित्यिकाचा सन्मान तसेच पुरस्कर वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात येणार आहे.साहित्य समाजाला दिशा देणारे आणि परिवर्तनाची जाणीव निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे याच विचारातून साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
या साहित्य संमेलनात कवी,लेखक,विचारवंत,शिक्षक आणि साहित्यिक या सर्वांना एकत्र आणणारे महत्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.सामाजिक परिवर्तन, समता, वैचारिक प्रबोधनांना चालला देणे हे या संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या साहित्य संमेलनासाठी विविध भागातील साहित्यिक कवी,लेखक,विचारवंत, शिक्षक,साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत.तसेच या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुरस्कारांसाठी आपले प्रस्ताव ९६७३३००५१५
या नंबर वरती सादर करावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक,आयोजक,प्रा. छाया तानबाजी बोरकर यांनी केली आहे.
