General

श्रेयसने दहावीत 92.80% गुण मिळवून विद्यालयाचा मान उंचावला

 

अर्जुनी/मोर :-  येथील सरस्वती विद्यालय, येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी श्रेयश उमाकांत सपाटे याने S.S.C. मार्च 2026 परीक्षेत 92.80 टक्के गुण प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

श्रेयशच्या या उज्ज्वल यशामुळे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे त्याने हे यश मिळविले.

सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अर्जुनी/मोर तसेच जी. एम. बी. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात संस्थेचे अध्यक्ष डॉ बलभदासजी भूतड़ा सचिव श्री सर्वेशजी भूतड़ा तसेच श्री जयप्रकाश भैया व प्राचार्य श्री पठान सर यानी र्श्रेयश सपाटे यांचा सत्कार करण्यात आला आहे . विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.