Tuesday, June 2, 2026
Latest:
General

जनतेचे हित जपणारे तहसीलदार मा. नरस्या कोंडागुरले

 

राजु फुंडे :प्रतिनिधि सालेकसा तालुक्याच्या प्रशासनात कर्तव्य, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा ठसा उमटवणारे नाव म्हणजे मा. तहसीलदार नरस्या कोंडागुरले साहेब.

 

अधिकारी अनेक येतात-जातात,पण जनतेच्या मनात घर करणारे फार कमी असतात…आपल्या शांत स्वभावाने, न्यायप्रिय भूमिकेने आणि कार्यतत्परतेनेकोंडागुरले साहेबांनी सालेकसाच्या जनतेमध्ये वेगळा मान निर्माण केला आहे.

 

गरिबांच्या अडचणी समजून घेणारे,शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे,कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता ठेवणारे,असे अधिकारी लाभणे हे तालुक्याचे भाग्यच म्हणावे लागेल.

 

त्यांच्या कार्याची ओळख पदावरून नाही,तर जनतेच्या विश्वासातून होते…!

 

कर्तव्याचा मार्ग ज्यांनी स्वीकारला,जनसेवेचा ध्यास ज्यांनी उराशी बाळगला…असे मा. नरस्या कोंडागुरले साहेबआज सालेकसा प्रशासनाचा मजबूत आधार बनले आहेत.

 

त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वाट अधिक सक्षम होवो,जनतेच्या सेवेत त्यांचे कार्य असेच तेजस्वी राहो,हीच सदिच्छा…!

 

“प्रामाणिक विचार, कर्तव्यनिष्ठ व्यवहार,जनसेवेसाठी सदैव तत्पर मा. नरस्या कोंडागुरले साहेबांना मानाचा सलाम!”