हलधर कॉन्व्हेंट कातुर्ली येथे सहा दिवसीय हिवाळी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न!
कातुर्ली /गोंदिया :- टायझेन स्पोर्ट्स मार्शल आर्ट्स अँड एज्युकेशन, गोजू-रियू यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हलधर कॉन्व्हेंट स्कूल, कातुर्ली येथे आयोजित सहा दिवसीय हिवाळी अर्धवार्षिक प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
दिनांक ११ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना कराटे तसेच विविध मार्शल आर्ट्सचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमता, आत्मविश्वास, शिस्त, स्वसंरक्षण कौशल्य आणि क्रीडा भावना विकसित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
या सहा दिवसीय शिबिरामध्ये खालील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कराटे व विविध मार्शल आर्ट्सचे विशेष प्रशिक्षण., बेल्ट टेस्ट परीक्षा., प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण., रेफरी प्रशिक्षण व मार्गदर्शन सेमिनार., विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना केवळ मार्शल आर्ट्सचे तांत्रिक ज्ञानच नव्हे, तर शिस्त, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, आत्मनिर्भरता आणि संघभावना यांचेही महत्त्व पटवून देण्यात आले.दरम्यान शिहान जनार्दन कुसराम यांनी मुख्य शिबिर प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हलधर कॉन्व्हेंट स्कूलचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालकवर्ग, सहकारी प्रशिक्षक आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी आयोजकांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून क्रीडा व मार्शल आर्ट्स क्षेत्रात नवीन प्रतिभावान खेळाडू घडण्यास निश्चितच मदत होईल.शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षण आणि क्रीडा संस्कारांचा संदेश देणारे हे सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले.
