अपघात

पोलीस वाहनासह दुचाकीच्या अपघातात तिघांचा बळी, परिसरात दुःखाचे सावट..! 

गोंदिया :- अपघातापासून सामान्य प्रवासांचे जीवन सुरक्षित रहावे यासाठी विविध उपाय योजना शासन प्रशासनातर्फे करण्यात येत असतील तरीही जीवघेण्या भीषण दुर्घटना बातम्या मन हेलावून टाकतात त्यातीलच एक गंगाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दांडेगाव बसस्टॉपच्या जवळ (दि. 25 नव्हे.) रोजी रात्री दहा वाजे दरम्यान दुचाकी व पोलीस वाहन यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवप्रसाद अरुण कांबळे वय सोळा वर्षे, रितेश जितेंद्र बरबन वय 16 वर्षे दोन्ही राहणार खळबंदा येथील असून कार्तिक ब्रिजलाल बिसेन वय 24 वर्षे राहणार शेजगाव असे मृतकाचे नाव आहे. मृतक तरुण हे धान मळणीच्या कामासाठी शेजगाव वरून खरबंदा कडे येत होते तर पोलीस वाहन क्रमांक MH 35AR 2210 हे 112 च्या तक्रारीचे अनुषंगाने तिरोडाकडे चालले होते दरम्यान हा भीषण अपघात घडला. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून खळबंदा व शेजगाव येथे दुःखाचे चावट पसरले आहे. दरम्यान पोलिसांनी मृतकाचे मृतदेह ताब्यात घेऊन सविच्छेदनासाठी केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलविले आहे. या घटनेची भीषणता व त्याचे मुख्य कारणांचा तपास गंगाजरी पोलीस करत आहे.