शिवभोजन केंद्रांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी
तिरोडा प्रतिनिधी:- तालुक्यातील शिवभोजन केंद्रांमार्फत गरजू व गरिब नागरिकांना अल्प दरात भोजन पुरविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. मात्र, सध्या कमर्शियल गॅस सिलेंडर (हंडा) अभावी केंद्रांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तिरोडा तालुका शिवभोजन केंद्र संघटनेच्या वतीने मा. तहसीलदार साहेब, तिरोडा यांना निवेदन देऊन ही समस्या मांडण्यात आली आहे. गॅस सिलेंडर नसल्यामुळे भोजन तयार करण्यात विलंब होत असून केंद्रांचे कामकाज सुरळीत चालविणे कठीण होत आहे.
संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली आहे की, शिवभोजन केंद्रांसाठी तातडीने कमर्शियल गॅस सिलेंडर (हंडा) उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून गरजू नागरिकांना वेळेवर भोजन मिळू शकेल.
या मागणीसंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे
उपस्थित असलेले संचालक होटल शिवकुमार शिवभोजन केंद्र, कृषि उत्पन्न बाजार समिति जवळ, तिरोडा मिलन कॉफी हाउस शिवभोजन केंद्र, चन्द्रभागा रोड, तिरोडा, सचिन भोजनालय शिवभोजन केंद्र, गांधी वार्ड, तिरोडा, संदीप खानग शिवभोजन केंद्र, कोर्ट समोर, गोंदिया रोड, तिरोडा आदी

Pingback: hello world