सरस्वती विद्यालयाची NMMS परीक्षेत बाजी;विद्यार्थ्यांंचे घवघवीत यश..!
अर्जुनी/मोर= स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2025–26 मधील NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झाला, तर अंतिम पात्रता यादी दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
सदर परीक्षेस विद्यालयातील एकूण 104 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी 12 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, ही गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक उत्तीर्ण संख्या तसेच सर्वाधिक पात्र विद्यार्थ्यांची नोंद ठरली असून, विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची ही ठळक साक्ष आहे.
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी आहेत याचना महेश नाकाडे, वाणी विनोद राहिले, साक्षी नरेंद्र कापगते, डिंपल हरिराम धनंजुळे, तनवी अविनाश रामटेके, तेजस विजय नान्ने, कृणाल महेंद्र वासनिक, यश राजेश लंजे, आकाश नंदलाल चांदेवार, उत्कर्ष देवराम उके, जशमित सुदेश शहारे आणि कृथार्थ मुकेश रामटेके सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹12,000 प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. सदर विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षका प्रशांत झोडे, सुरेश आरसोडे, राहुल पुस्तोडे,किरण पर्वते व अमर वसाके सर यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य जे.डी. पठाण , उपप्राचार्या अर्चना गुरूनुले,पर्यवेक्षक शिवचरण रार्घोते यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले आहे. विद्यालयाचा हा निकाल संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
