General

डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचे कोहमारा येथे भव्य स्वागत..!

 

सडक अर्जुनी.:-  भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर

यांचे रविवारी (ता.3) सकाळी 10 वाजता बालाघाटकडे जात असतांना कोहमारा येथे आगमन होताच त्यांचे भारतिय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेच्या संस्कार सचिव नीना खुशालदास राऊत यांच्या कोहमारा येथील निवासस्थानी जंगी स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी डॉ. भीमराव आंबेडकर यांचे भारतीय बौद्ध महासभेचे नागपूर जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक विलास उंदीरवाडे, जिल्हा शाखेच्या संस्कार सचिव नीनाताई राऊत, खुशालदास राऊत,मिलन राऊत, हर्षा राऊत यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी संस्थेचे आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रवीण निखाडे, राष्ट्रीय संघटक इंजी. पद्माकर गणवीर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव पुसे ,पुज्य भंतेजी पय्याशिरी,वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष श्री वानखेडे , मध्यप्रदेश शाखेचे राज्य संघटक आणि सडक अर्जुनी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुखदास मेश्राम , पुरुषोत्तम रामटेके, तसेच पत्रकार आर. व्ही .मेश्राम , बिर्ला गणवीर, प्रा.डॉ. राजकुमार भगत , चंद्रकांता मेश्राम, मनिषा शहारे , स्नेहा गणवीर, कल्पना खांडेकर, करुणा उके,कमला उके,सागर शहारे, सुभाष बडोले, उंदिरवाडे, ऐश्वर्या राऊत, संजय साखरे,विपा बडोले, मोटू साखरे आदी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते , वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे सैनिक, उपासक व उपासिकामोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. भीमराव आंबेडकर यांचे स्वागत पुष्पगुच्छ व पुष्पमालेने आणि जयघोषाने करण्यात आले.विनंतीस मान देऊन कोहमारा येथे थोडावेळ थांबून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गोंदिया तर्फे डॉ. भीमराव आंबेडकर यांचे आभार मानण्यात आले. स्वागत कार्यक्रमानंतर अल्पोहार झाल्यावर डॉ. भीमराव आंबेडकर हे पुढील कार्यक्रमासाठी बालाघाटकडे प्रस्थान झाले