महाराष्ट्

जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळालीच पाहिजे: आमदार अभिजीत वंजारी

 अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे संलग्न विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीची सभा संपन्न

तिरोडा/गोंदिया :- 

मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीची सभा मार्तंडराव पाटील कापगते विद्यालय,तथा कनिष्ठ महाविद्यालय जांभळी/ सडक येथे दि.२ आँगष्ट ला सकाळी ११.३० वा झाली.

या सभेला नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळण्यासाठी सभागृहात पाठपुरावा केला. कोर्टात केस सुरू आहे. शासनाने यावर तोडगा काढायला पाहिजे. पदवीधर असलेल्या सर्वांचे मतदार फार्म भरून घ्यावे असेही सांगितले.

संघाचे अध्यक्ष समीर देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक मारोती खेडेकर, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष राज्य सहसचिव सतिश जगताप, राज्य प्रसिद्धी प्रमुख सज्जन पाटील,मार्गदर्शक कवडू वेलथरे,विदर्भ सचिव दिनेश तायडे, कोषाध्यक्ष मुकूंद मशाखेत्री, उपाध्यक्ष धनराज हुकरे , संघटन सचिव डी.आर. गिरीपुंजे,महिला संघटक रझीया बेग,मार्गदर्शक रेखा भेंडारकर, भागवत माटे, ज्ञानेश्वर गलांडे, प्रमोद धार्मिक, बळीराम झामरे अकोला,उपाध्यक्ष दीपक बोकडे ,भंडारा जिल्हा अध्यक्ष राजकुमार बालपांडे , नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विलिन आरघोडे, प्रसाद चंदावार, अरुण कडव , दिनेश बहेकार विदर्भातील जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील मुख्याध्यापक प्रमुख्याने उपस्थित होते.

या सभेत पवित्र पोर्टलची मुदत वाढ करणे, जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेत शासकीय योजनांंचा सारख्या प्रमाणात लाभ न मिळणे, तुकडी मिळण्यासाठी कला शाखेतील विद्यार्थी संख्या कमी करावी,युवा मुख्यमंत्री योजनेचा लाभ मिळावा, शालेय पोषण आहार चे साहित्य मिळावे,२५-२६ मधील माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धाचा निकाल लागला नाही, मानव विकास

योजनेचा लाभ मिळाला नाही.२०%,४०% वर शाळा अनुदानित असलेल्या शिक्षकांना दर महिण्याला त्या प्रमाणात वेतन द्यावे.८ वा वेतन आयोग यावर चर्चा.अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

सुरूवातीला पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पुजन व दीप प्रज्वलित करण्यात आले.प्रस्थापित विदर्भ सचिव दिनेश तायडे यांनी केले. संचालन उमेश रायपुरकर यांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्या अर्चना बावणे यांनी केले.