अल्पवयीन मुलीचे जीव वाचवण्यात जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अपयशी..!
राज डाहाट /गोंदिया :- जिल्ह्यात किशोरवयीन मुलींची अत्यंत दयनीय अवस्था आहे असे म्हणता येईल कारण दिनांक 22 ऑक्टोबर रोजी मृतक स्वाती नरेश खैरे वय 16 वर्षे राहणार मारी टोला. तिला शाळेतच डोकेदुखी वाढली असून उलटीचा त्रास वाढला. त्यावेळी सुट्टी घेऊन घरी परतली. घरी पुन्हा त्रास वाढत असल्यामुळे सदर परिस्थिती पाहून घरच्यांनी तिला ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे दाखल केले मात्र परिस्थिती इतकी गंभीर होती की, दिनांक 23 च्या दुपारी स्वातीचा जीव वाचू शकला नाही. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून काय उपचार दिला त्याविषयी बोलणे अपेक्षित नसले तरी येणाऱ्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये त्याचे कारण कळू शकेल. पण अवघ्या 24 तासातच डोकेदुखी, मळमळणे अशा लक्ष्णच्या आधारे उपचार देत असताना स्वातीचा जीव वाचू शकला नाही. ही घटना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना काळीमा फासणारी आहे.
अशा वेळी शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम च्या अनुषंगाने ग्रामीण भागातील शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींना सेवा देणाऱ्या यंत्रणेची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. त्याने सदर मृतक मुलीचे डाटा एन्ट्री रजिस्टर ला नोंद केली होती की नाही, असल्यास त्याबाबत तिच्या तब्येतीचे कोणते दाखले त्यांच्याकडे आहेत. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांनी या घटनेबाबत कोणती दखल घेतली या बाबींची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. शेवटी मृतक स्वाती पुन्हा शाळेत येणे शक्य नसले तरी अशी घटना यापुढे कोणत्याही मुली सोबत घडू नये इतकेच.
गरिबीच्या काळोखात जगणारी स्वाती आई-वडिलांशिवाय राहायची त्याला कारण असे की, तिचे आई वडील मोलमजुरीकरिता हैदराबाद परिसरात कामाला असल्याचे माहिती मिळाली आहे. घरी आजी-आजोबा इतर भावंडांच्या सोबत वास्तव्य करायची मात्र या घटनेने संबंधित परिजनांना चांगलाच धक्का दिला.
आई घरी असती तर…
“या वयात मुलींचे जीवनात होत असलेल्या बदलांचे आधारे आईची गरज ही अत्यंत मोलाची मानली जाते. अशावेळी आई शिवाय कुठलाही पर्याय अपुरा ठरतो. शेवटच्या वेळी आई सोबत असती तर…. कदाचित स्वाती आज जिवंत असती.”
या घटनेने इतकेच म्हणता येईल की,
राज्यस्तरावर उत्कृष्ट सेवा पुरवत असल्याच्या बोंबा मारणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे उडवले. या घटनेची दखल घेत पोलीस स्टेशन आमगाव येथे मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
