पुन्हा एकदा गोंदिया वनपरिक्षेत्रात नर सारस पक्षाचा मृत्यू..! दोन दिवसांपूर्वीची घटना..
राज डाहाट/गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्षाचे अधिवासासाठी गोंदिया जिल्ह्यात विशेषतः गोंदिया तालुका तालुक्यात अनेक सारस पक्ष्यांचे जोडपे पाहायला मिळतात त्यापैकी एका जोडप्यातील नर सारस पक्षी हा मृत्युमुखी पडल्याची घटना गोंदिया वनपरिक्षेत्रातील दासगाव राऊंड येथील शेत शिवारात (दि. 27 ऑक्टो) रोजी निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथकाने घटनास्थळ गाठून मृत सारास पक्षाला कुडवा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सवविच्छेदनासाठी आणले व त्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली.
या घटनेने राज्यातील पक्षी प्रेमींनी सदर घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचे अत्यंत काटेकोर निरीक्षण व्हावे असे संताप जनक शंका व्यक्त केली.
सूत्रकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत नर सारस हा चार वर्षा दरम्यानचा असून त्याची दोन पिल्ले आहेत. नर व मादा दोन्ही मिळून आपल्या पिल्लांचे संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात मात्र सदर नर सारस चे लोकेशन मिळण्यासाठी त्याच्या पंखाला लावण्यात आलेले यंत्र हे त्याला वेळोवेळी त्रासदायक होत असल्याने त्याच्या वास्तव्यात होत असलेला त्रास अधिकच वाढला व त्याच्या संसर्गाने कदाचित सदर मृत्यू ओढावला अशी शंका पक्षीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
या पक्षांच्या देखरेखीसाठी प्रत्येकी तीन महिन्यात त्याला लावलेल्या यंत्रणांची तपासणी होऊन कौशल्यपूर्ण पथकाद्वारे त्याची नियमित देखरेख अपेक्षित आहे मात्र या घटनेत असे होताना दिसले नाही असेच म्हणावे लागेल. कार्यकारी यंत्रणेने त्यांच्या अधिवासाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्याचे केले नसल्याचे लक्षात येत आहे. या कार्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या संस्थेतर्फे स्थानिक स्तरावर मानद पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांच्या व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त देखरेखित सदर पक्षांचे सनियंत्रण राखले जाते त्यासाठी लाखोंचा निधी देखील पुरवल्या जातो मात्र मागील काही वर्षांचा आढावा घेतला असल्यास अनेक सारस पक्षांचे मृत्यू या परिक्षेत्रात पाहायला मिळाले हे तितकेच सत्य आहे. त्यासाठी अनेक कारणे असू शकतात मात्र त्याची कारणीमीमांसा होते का असा सवाल पक्षी मित्रांच्या मनात घर करू लागला आहे.
दरम्यान सदर सारस पक्षी हा दोन दिवसापूर्वीच मृत पावला होता (दि. 27 ऑक्टो.) रोजी त्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने त्यास उचलून त्याची पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर सदर पक्षाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट सांगता येईल अशी माहिती सहाय्यक वन परिक्षेत्राधिकारी विजय धांडे यांनी दिली.
यावरून असे लक्षात येते की मृत नर सारस पक्षाचे लोकेशन हे वनविभागाकडे नव्हते त्यामुळे शेवटच्या क्षणी सुद्धा वन विभागला त्याची काळजी घेता आली नाही असे म्हणता येईल.
