डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून कामगाराची केली हत्या..!
– अज्ञात गुन्हेगारांनी केलेल्या हत्तेमुळे परिसरात भीतीचे वातावरण
– परिसरात पोलीस बंदोबस्त अधिक तीव्र गतीने वाढवण्याची नागरिकांची मागणी
गोंदिया :- दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशीच एक घटना दिनांक( 22 सप्टे) रोजी कामावर जात असताना रात्री साडेसात वाजे दरम्यान एमआयडीसी मुंडीपर येथे काही असमाजिक तत्त्वांची निगडित असलेल्या अज्ञात गुंडांनी धारदार शस्त्रांच्या साहाय्याने मृतक रविशंकर उदयलाल रहांगडाले वय 58 वर्षे राहणार मुंडीपार च्या डोक्यावर वार करून हत्या केली आहे. सदर घटनेची माहिती मिळतात परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलीस स्टेशन गंगाजरीचे पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठून मृतकास शवविच्छेदनासाठी केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पाठवले हत्येचे कारण अद्याप कडु शकले नाही. याविषयी गंगाजरी पोलिसांनी अप. क्रमांक 470/26 गुन्हा दाखल करून 103 (1) BNS तसेच विविध कलमांसहित गुन्हा दाखल करून पुढील तपास एपीआय धीरज राजूरकर हे करत आहेत.
