General

रामनगर येथील निवासस्थानी शेतकरी, नागरिक, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

गोंदिया :- भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज रामनगर येथील निवासस्थानी खासदार श्री. प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच नागरिक आणि शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या विविध अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या.

 

यावेळी नागरिक व शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची दखल घेत खासदार श्री. पटेल यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्राधान्य देत रस्ते, सिंचन व अन्य समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी सदैव कटिबद्ध राहिले आहेत.