तंत्रज्ञान

ऐतिहासिक अभ्यास संशोधन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील लोहयुगीन स्थळांची पाहणी केली

तिरोडा/ प्रतिनिधी :-     गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सातोना/बोरगाव येथील महसूल गट ग्र.३२,३१/६७९ परीसरात 70 प्रस्तरवृत दिसत असून बोरगाव, वडेगाव व सातोना येथील प्रस्तरवृत 150 से. मी ते 1700 से.मी आकाराचे व्दिसमकेंद्री प्रकार चे जांभा प्रकारच्य दगडांचा प्रकार दिसत असून.या स्थळांची पाहणी करण्याकरीता इतिहास अभ्यास संशोधन मंडळ गोंदिया पदाधिकारी अनील देशमुख, मुख्य समन्वयक दुलिचंदराव बूध्दे, उपाध्यक्ष योगेश पारधी,तिरोडा येथील इतिहास अभ्यास संशोधन मंडळाचे सदस्य चंद्रकुमार पटले, प्राचार्य तथा पत्रकार डी आर गिरीपुंजे ,यु टी.पारधी, जी डी हटवार पोलीस पाटील सातोना, यांनी प्रत्येकक्ष भेट देऊन पाहणी केली .

 

पाहणी करताना सदर जागेवर वनविभागाच्या वतीने बांधकाम केले जात असल्याने दिसून आले.नुकत्याच गोंदिया येथे इतिहास अभ्यास संशोधन मंडळांच्या संपन्न झालेल्या सभेत पुरातत्व विभागाचे सहाय्यक आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आयोजित सभेत अश्या स्थळांवर बांधकाम करताना महाराष्ट्र शासन शिक्षण व सेवा योजना विभाग यांचे पत्र क्र.एए नेम/१७८१/१६८८४०(२२४६) प्रशा.४ मंत्रालय मुंबई दिनांक १० सप्टेबंर १९८२अन्वये अशा पुरातन ऐतिहासिक जागेवर पुरातत्व विभागाची “नाहरकत प्रमाणपत्र” किंवा पुर्व परवानगी घेऊनच बांधकाम करण्याबाबत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या असतांनाही वनविभागानी सदर जागेवर बांधकाम सुरू केले आहे.या पुर्वी नागपूर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर स्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.असेच स्थळ माल्ही/गागंला/सिल्ली येथे ही स्थळे दिसून आले असून माल्ही येथील बराच खोदकाम पुरातत्व विभागाचे वतिनै करण्यात आले आहे.

स़दर स्थळ हे प्रशासनाने सुरक्षित स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यास संशोधन मंडळाचे वतिने‌ नागपूर येथील पुरातत्व विभागाकडे करण्यात आली आहे