देवरी पोलिसांची ड्रग्सविरोधी कारवाई: एमडी पावडरसह दोन जणांना अटक
देवरी : देवरी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत 1.5 ग्रॅम एमडी पावडर जप्त केली असून, याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई देवरी शहरातील मुख्य बसस्टॉप परिसरात करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरात एमडी पावडरची खरेदी-विक्री सुरू झाले आहे.
पोलिसांनी रात्री गस्त दरम्यान शहरातील दोन संशयितांच्या हाती एमडी पावडर असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधिकारी गंगाकचूर, गिता मुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी रोशन डोळे, कादें, विशाल खांडेकर, पंकज पारधी, सुधीर जांगळे आणि लक्ष्मण बागडे यांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केल्यानंतर 1.5 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. या पावडरची बाजारभाव अंदाजे 3 ते 5 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
याशिवाय, पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल फोन आणि एक मोटारसायकलही जप्त केली आहे. एमडी पावडर कुठून मिळाली याचा तपासही पोलिस करत आहेत. देवरी पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांचे आवाहन
उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा जसे दारू, मटका, जुगार, पत्त्याचा क्लब वगैरे सुरू असल्यास तत्काळ 112 या नंबरवर संपर्क साधावा. अशा माहितीच्या आधारे पोलीस तातडीने कारवाई करतील.
माहिती देणाऱ्या नागरिकांनी आपले नाव सांगण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे भीती बाळगू नका. पोलिस नियंत्रण कक्षाकडून संबंधित ठिकाणी पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी तात्काळ पाठवले जातील आणि तपासणी करून संबंधित कारवाई करतात. तसेच दिलेल्या माहितीच्या पुढील तपशीलाबाबतही नियंत्रण कक्षाला कळविणे आवश्यक आहे.
वरिष्ठ अधिकारी या कारवाईवर लक्ष ठेवत असल्याने नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे देवरी शहरातील एमडी पावडरच्या विक्रीवर मोठा ठप्पा बसण्याची शक्यता असून, पोलिसांनी अवैध पदार्थांवर कडक कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या अवैध कृत्यांबाबत जागरूक राहून त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन देण्यात येते.

Pingback: buying androxal generic name
Pingback: cheap enclomiphene generic alternatives
Pingback: how to buy rifaximin cheap canada
Pingback: order xifaxan purchase prescription
Pingback: how to order staxyn cheap pharmacy
Pingback: discount avodart generic brand
Pingback: order dutasteride usa price
Pingback: cheap flexeril cyclobenzaprine usa online no prescription
Pingback: buy cheap gabapentin generic from canada
Pingback: acheter kamagra pharmacie gratuit pilules
Pingback: cheapest buy itraconazole australia buy online
Pingback: is generic fildena effective
Pingback: generique kamagra